शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

आयटीयन्स का होत आहेत हँंग....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 7:03 PM

महाराष्ट्रातील पुण्याची ओळख आयटी हब म्हणून विस्तारत असताना त्या क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रकारच्या बदलांनी आयटी युथ जेवढा भारावून गेला आहे तितकाच तो गोंधळलेला दिसत आहे.

ठळक मुद्दे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, कँनडा आणि ब्रिटन सारख्या देशांमध्ये भारतीय आयटी तरुणांची संख्या मोठी कल्पकतेला आव्हान देत काम करण्याची तयारी आयटी क्षेत्रातील तरुणांना दाखविणे गरजेचेपुण्यातून परदेशात जॉब करिता जाणा-या आयटीएन्स ची टक्केवारी अंदाजे १२ ते १५ टक्के 

पुणे :  काळ मोठा बाका आहे. बदलत्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने होणारी क्रांती पाहता त्या बदलांची पावले सर्वप्रथम परदेशात उमटायला सुरुवात होते. महाराष्ट्रातील पुण्याची ओळख आयटी हब म्हणून विस्तारत असताना त्या क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रकारच्या बदलांनी आयटी युथ जेवढा भारावून गेला आहे तितकाच तो गोंधळलेला दिसत आहे. गल्लेगठ्ठ पगार आणि झकपक लाईफ स्टाईल असणारी तरुणाई  हँग अवस्थेत आहे. एकीकडे पगार, बढती दुस-या बाजुला कौंटूंबिक जबाबदारीचे ओझे वाहत असताना आपल्या क्षेत्रातील स्थान टिकवून ठेवण्याचे आव्हान कायम आहे.      नवीन स्पर्धा, संघर्ष, कंपन्यांची सतत बदलणारी धोरणे यासगळ्याचा सामना करत स्वत:तील सर्जनशीलता व कल्पकतेला आव्हान देत काम करण्याची तयारी आयटी क्षेत्रातील तरुणांना दाखविणे गरजेचे ठरते. कामाचा येणारा ताण, कंपनीनुसार पगाराचे बदलते आकडे, त्याचा पडलेला मोह यामुळे आता नव्याने काही प्रश्न या क्षेत्रात तयार झाले आहेत.   गेल्या २२ वर्षांहून अधिक काळ आयटी सेक्टरमध्ये काम करणा-या तसेच मोठमोठ्या आयटी कंपन्यांमध्ये रिक्रुटमेंट विभागात काम करत असलेल्या तज्ञांशी संवाद साधला असता त्यांनी सुरुवातीला नाव न देण्याच्या अटीवर माहिती सांगितली. ते म्हणाले, मागील काही दोन ते तीन वर्षांपूर्वी आपल्याकडील आयटी सेक्टरमध्ये मंदी होती. आता ते चित्र बदलले आहे. न्यु बिझनेस, टेक्नोलॉजी, सतत वाढत आहे. आयटी ट्रेंड घेवून त्यात पदवीधर, डिप्लोमा होणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मुळातच भरघोस पगार व वेगवेगळ्या संधी पदरात पाडून घेणे याकडे त्यांचा ओढा असतो. पूर्वी एखाद्या कंपनीत त्या कंपनीची परंपरा, विश्वास, दर्जा, भावनिक गुंतवणूक याकडे बघुन तिथुन सहजासहजी पाय निघायचा नाही. आता वर्ष दोन वर्षात किमान दोन ते तीन कंपन्या आयटीयन्स ने बदलेल्या असतात. त्याशिवाय त्यांच्या रिज्युमला देखील वजन येत नाही. अशी परिस्थिती आहे.  मानसिक दृष्ट्या संमाधानकारकता हा कळीचा मुद्दा आहे. मात्र त्यांची संख्या तुलनेने कमी दिसून येते. ...................................आज स्ट्रेस मँनेजमेंटकरिता भरपूर आॅप्शन उपलब्ध असताना त्यापैकी एक निवडून काही करुन ताण दूर करण्याला पसंती दिली जाते. मात्र पँकेजबद्द्ल सतत शंकास्पद व अतिमहत्वकांक्षी असणे या दोन गोष्टींमुळे आयटीतील तरुणांना अनेकदा मानसिक संघषार्ला सामोरे जावे लागत आहे. परदेशात स्थायिक व्हायचे हा तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्याला केवळ पैसा हेच कारण नाही तर सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रांची वेगवेगळी पार्श्वभूमी आहे. तर दुस-या बाजुला आकर्षक पगारांसोबतच नव्या घराचे लागलेले वेध, होम लोन, यामुळे जॉब, कामाचा अतिताण आणि त्यामुळे नैराश्य अशा गर्तेत अनेकजण अडकत चालल्याचे दृश्य आयटी क ल्चरचा एक नवा भाग बनले आहे.   ..............................* एम एस करण्यासाठी परदेशात जाणा-यांची मोठी संख्या आहे. ती पदवी घेतल्यानंतर तिथेच जॉब करायचा. संबंधित देशाचे नागरिकत्व घेण्यासाठी धडपडणे यात त्यांची खुप शक्ती वाया जाते. आता अमेरिकेत एल वन नावाच्या व्हीसा मिळण्यास अनेक अडचणी येत आहेत. एखाद्या कंपनीकडून किमान दोन ते तीन वर्ष परदेशात जाण्याची मिळते. तिथेच विवाह केल्यानंतर शक्यतो परदेशातच अपत्यप्राप्ती होवू देण्यास प्राधान्य दिले जाते. पुढे त्या मुलाला संंबंधित देशाचे नागरिकत्व मिळते. अशा पध्दतीने देखील परदेशी राहण्यासाठी विविध पर्याय अंमलात आणले जातात. आता तर अमेरिका, ब्रिटन सारख्या देशात आर्टीफिशियल इंटेलिजिन्सच्या तंत्रज्ञानात कमालीची वाढ होत असताना भविष्यात आयटी सेक्टरमधील नोक-यांवर त्याचे गंभीर परिणाम होतील. अशी भीती आहेच. - निरंजन रेड्डी (सायबर तज्ञ) ...........................* वेगवेगळ्या मल्टिनँशनल सॉफ्टवेअर कंपन्यांकडून मोठ्या पगाराची आॅफर केली जाते. अशावेळी  आयटी सेक्टरमध्ये किमान दोन वषार्नंतर सातत्याने स्वीचिंगच्या नावाखाली कंपनी बदलली जाते. पगाराबरोबरच परदेशात जाण्याची संधी देखील असल्याने प्रमोशन होण्याची स्वप्ने तरुणाईला पडू लागतात. यामुळे जॉब चेजिंग सुरुच असते. मात्र त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वावर होणारा परिणाम, आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष याची पर्वा आयटी तरुणाई करताना दिसत नाही.  ह्यह्यओव्हर अम्बिशियस ही संकल्पना देखील सध्या मोठ्या प्रमाणात आयटी सेक्टरमध्ये पाहवयास मिळते. याचा परिणाम म्हणजे अधिक पगाराच्या अपेक्षेत जास्त कामाचा ताण आपल्याकडे ओढून घेणे त्यातून मानसिक अस्थिरपणाला सामोरे जाणे असे चित्र दिसू लागले आहे. .................................* - पुण्यातून परदेशात जॉब करिता जाणा-या आयटीएन्स ची टक्केवारी अंदाजे १२ ते १५ टक्के  - जॉब व्हलिडीटी संपल्यावर पुन्हा भारतात परतणा-यांची टक्केवारी अंदाजे ४ ते ५ टक्के - भारताबरोबरच इतर देशांमध्ये देखील आयटी ट्ँक्स आहेच. मात्र त्या टँक्स भरल्यानंतर मिळणा-या नागरी सुविधा यांची भारतातील सुविधांशी तुलनाच होवू शकत नसल्याचे आयटी तरुणांचे म्हणणे आहे. - अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, कँनडा आणि ब्रिटन सारख्या देशांमध्ये भारतीय आयटी तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. 

टॅग्स :PuneपुणेITमाहिती तंत्रज्ञान