एकंदरीतच गेल्या पंधरवड्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्याने गेल्या आठवड्यात ऑक्सिजन सिलिंडरच्या वितरणासंदर्भात दौंड आणि हवेलीचे तहसीलदार यांची शाब्दिक हमरीतुमरी आरोप प्रत्यारोपाच्या माध्यमातून झाली असल्याची वस्तुस्थिती होती. एकंदरीतच सध्याच्या परिस्थितीत दौंड तालुक्याला अपूर्ण स्वरूपाचा ऑक्सिजन पुरवठा असल्याची वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही, मात्र जो काही ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे, त्यावर तहसीलदार संजय पाटील आणि त्यांच्या शासकीय यंत्रणेचे नियंत्रण असल्याने ऑक्सिजन पुरवठा कमी जास्त प्रमाणात होत आहे.
तालुक्यात शासनाने पाटस, वरवंड, बोरीभडक, गिरीम, लिंगाळी, वेताळनगर, दौंड या आठ ठिकाणी कोविड सेंटर सुरु केले आहे. याचबरोबरीने तालुक्यात ३२ समर्पित रुग्णालय केंद्रे सुरु केली आहेत. यातील ३० केंद्रे खासगी रुग्णालयात तर दौंड उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, यवत ग्रामीण रुग्णालय ही दोन केंद्रे शासकीय आहे. एकंदरीतच कोरोना रुग्णांची वाढती परिस्थिती पाहता शासकीय आणि खाजगी रुग्णालये गजबजलेली आहे. मात्र व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना प्रतीक्षा करावी लागते. किंबहुना बेडअभावी रुग्णांना पुणे, पिंपरी या शहरी भागाकडे धाव घ्यावी लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.
--
चौकट
--
ऑक्सिजन बाबत खबरदारी घेतली जाते.
दौंड तालुक्यासाठी ऑक्सिजन मिळावा यासाठी युध्द पातळीवरा प्रयत्न असतात दररोज आठशेच्या जवळपास सिलेंडरची आवश्यक्ता आहे मात्र मिळतात सातशेच्या जवळपास सिलेंडर. तेव्हा ऊर्वरीत सिलेंडरचा तुटवडा भरून काढण्यासाठी डॉक्टराना ऑक्सिजन वाया जाणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
- संजय पाटील
( तहसीलदार )