कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले. तर काहींवर उपासमारीची वेळ आली.परिणामी शहरात रोजगारासाठी आलेल्या नागरिकांचे मोठे स्थलांतर झाले. त्यामुळे शहरातील काही शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी झाली असून शाळांमधील तुकड्याही कमी झाल्या आहेत. परंतु, पुढील काही महिन्यात शाळा सुरू कराव्या लागणार आहेत. त्यासाठी शासनाच्या नियमावलींच्या अधिन राहून शाळा सुरू कराव्या लागतील. मात्र, कोरोना परिस्थिती सुधारणा झाली नाही तर डिजिटल स्कूलच्या उभारणीची गरज आहे. त्यासाठी शिक्षकांना तयारी करावी लागेल, असे मुख्याध्यापक संघटनेचे प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरी डॉ. नितीन करमळकर म्हणाले, विद्यापीठाचे 40 टक्के विद्यार्थी वाणिज्य शाखेचे आहेत.त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण घेतानाच प्रशिक्षणाचा अनुभव मिळणार आहे.डायग्नॉस्टिक सेंटर उभारण्यावर भर दिला जाईल.युनिव्हर्शिलयजेशन आॅफ इंडियन ट्रॅशिनल नॉलेज सिस्टीम अंतर्गत विविध आॅनलाइन क्रेडिट अभ्यासक्रम तयार करण्याचे काम सुरू आहे.ज्वेलरी डिझाईन,डान्स थेअरपी, गिर्यारोहण आदी नावीन्य पूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.