पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात चांगल्या प्रतीच्या रत्नागिरी हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. सध्या आंब्याचा हंगाम सुरळीत सुरू झाला आहे. ग्राहकांकडूनही हापूसची मागणी वाढली आहे. त्यामुळे हापूसचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. अक्षय तृतीयेपर्यंत आंब्याचे भाव टिकून राहतील. त्यानंतर आंब्याचे दर घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.रविवारी फळबाजारात रत्नागिरी हापूसच्या ८ ते १० हजार पेट्यांची आवक झाली. १४ ते १५ हजार पेटी कर्नाटक हापूसची आवक झाली. सध्या आंब्याची आवक वाढली असून काही प्रमाणात मागणीही वाढली आहे. आंब्याचा हंगाम सुरळीत सुरू झाला असून पहिला बहार संपत आला आहे. चांगल्या प्रतीचा आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा बाजारात दाखल होत आहे. दुसरा बहार लवकरच सुरू होईल, असे मार्केट यार्डातील आंब्याच्या व्यापाऱ्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
हापूस आवाक्याबाहेरच
By admin | Published: April 17, 2017 6:30 AM