शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

Bhimashankar Temple: हर हर महादेव...! श्रावणी सोमवारी भीमाशंकरला हजारो भाविक भोलेनाथाच्या चरणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 3:08 PM

गुरुवारी स्वातंत्र्यदिन अन् शनिवारी - रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून श्री क्षेञ भीमाशंकर येथे गर्दीचा महापुर पहावयास मिळाला

भीमाशंकर: बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणार्‍या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे तिसर्‍या श्रावणी सोमवारी भाविकांनी ओम नमः शिवाय, हर हर महादेव, जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय असा जयघोष करत अधुन मधुन येणार्‍या हलक्या श्रावणाच्या सरी व दाट भाविकांनी पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेत आहेत. या वेळी शिवलिंगावर आकर्षक अशा विविध रंगांच्या फुलांची सजावट करण्यात आली होती.     सोमवार (दि.१९) रोजी आज पहाटे चार वाजता मंदीर उघडण्यात आले. गाभारा मंदिर व परिसराची साफसफाई झाल्यानंतर पाच वाजेच्या दरम्यान शिवलिंगावरती दही दुग्ध असा महाजलाभिषेक करुण पुजा करण्यात आली. या नंतर डमरुनाद व शंखनाद ब्रम्ह वृंद गोरक्ष कौदरे यांनी करत महाआरती करण्यात आली. महाआरती झाल्यानंतर लगेचच मंदीर दर्शनासाठी खुले करण्यात आले. गुरुवारी स्वातंत्र्यदिन शुक्रवारी, शनिवारी व रविवारी ह्या चारही दिवशी श्री क्षेञ भीमाशंकर येथे गर्दीचा प्रचंड महापुर पहावयास मिळाला ह्या चार दिवसामध्ये सुमारे साडे सात ते आठ लाख भाविकांनी पविञ अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले.तिसरा श्रावणी सोमवार व त्यामध्येच रक्षाबंधन हा सण आल्यामुळे दिवसभरामध्ये गर्दीचे प्रमाण अत्यंत कमी होते. दुपारपर्यंत दर्शनबारी ही महाद्धाराच्या खालोखाल आली होती.        दर्शनपास व व्ही. आय. पी. दर्शन बंद केल्यामुळे येणाऱ्या भाविकांचे लवकरात लवकर दर्शन होत होते. स्वकाम सेवामंडळ आळंदी येथील भक्त गण मंदीर मंदीर परिसर दर्शनबारी  पायरी मार्ग येथील स्वच्छता करत होते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या ९ मिनीबस व २६ मोठ्या बस ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे भाविकांना फार वेळ थांबावे लागत नव्हते. यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस निरिक्षक राजकुमार केंद्रे व सहाय्यक पोलिस निरिक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वाहनतळे बस स्थानक, मंदीर परीसर पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर पायऱ्या, दर्शन बारी गाभार्‍या मध्ये मंदिर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड सुरेश कौदरे उपकार्यकारी विश्वस्त मधुकर शास्त्री गवांदे, विश्वस्त दत्तात्रय कौदरे, गोरक्ष कौदरे,भोरगिरी ग्रामपंचायत भीमाशंकरचे सरपंच दत्ताञय हिले, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे, उदय गवांदे आशिश कोडिलकर, राहुल कोडीलकर, प्रसाद गवांदे मंदिरात थांबून मंदिरातील इतर नियोजन व भाविकांच्या समस्या सोडवण्याचे काम करत होते.

टॅग्स :PuneपुणेBhimashankarभीमाशंकरTempleमंदिरSocialसामाजिकPoliceपोलिसJyotirlingaज्योतिर्लिंग