- नेहा सराफपुणे : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही नियम ठेवून बहुतांश कंपन्या चालू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र हजारो कामगारांनी स्थलांतर केल्याने अनेकांना कारखाने बंद ठेवावे लागत आहेत. त्यातच उपलब्ध असलेल्या कामगार वर्गाची पळवापळवी सुरु झाल्याने कारखानदार हैराण झाले आहेत.भोसरी एमआयडीसीतील ११ हजार कंपन्यांची नोंदणी आहे. त्यातील बहुतांश कंपन्यांनी कामगारांना मार्च-एप्रिलचा पगार दिला. मात्र तरीही खचलेल्या कामगारांनी घरी जाणे पसंत केले.कामगारांची पळवापळवीचाकण आणि रांजणगाव एमआयडीसी या लवकर सुरु झाल्या. त्यामुळे अनेकांनी इतर ठिकाणी असणाऱ्या कुशल आणि प्रशिक्षण दिलेल्या कामगारांना अधिक रोजगार, किराणा आणि राहण्यासाठीची खोली देतोसांगून तिथे कामाला नेले. त्यामुळे या कामगारांच्या आधीच्या कंपनीने पगार देऊन, राहण्याची सोय करून देखील त्यांच्या नशिबी नवे कामगार शोधण्याची वेळ आली आहे. पुढचे काही महिने कुशल कामगारांची पळवापळवी अपरिहार्य असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.पुण्याच्या औद्योगिक पट्ट्यात सुमारे पाच लाख कामगार लघु उद्योगात काम करत होते.मात्र कोरोनामुळे जवळपास तीन लाख कामगारांनी स्थलांतर केले आहे. आता कारखाने सुरु कसे करायचे हाच प्रश्न आहे. कामगारांची टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.-संदीप बेलसरे, अध्यक्ष पिंपरी- चिंचवड लघूउद्योग संघटनापुणे जिल्ह्यात अडकलेल्या उत्तरप्रदेश, बिहार तसेच इतर राज्यातील ८० हजार मजुरांना घेऊन ३० विशेष रेल्वे व दोन हजार बसगाडया पुण्यातून रवाना झाल्या. त्यानंतरच्या २ दिवसांत १८ रेल्वेगाडयांचे नियोजन केले गेले.- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी
कामगारांच्या पळवापळवीने कारखानदार हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 3:20 AM