शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

पुण्यातील नवविवाहितेला होणाऱ्या छळापासून अमेरिकन पोलिसांनी वाचवलं; नेमकं काय घडलं?

By विवेक भुसे | Updated: March 15, 2023 17:19 IST

नणंदेने धर्मांतर करण्यासाठी त्रास दिला तर पतीने अमेरिकेत बोलावून घेऊन तेथे छळ सुरु केला

पुणे : मुलीच्या प्रेमसंबंधामुळे तिच्या आईवडिलांनी कोट्यावधी खर्च करुन तिचा विवाह लावून दिला. मानपान घेऊनही मुलीचा गृह प्रवेशासाठी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पॅकेजची मागणी केली. नणंदेने धर्मांतर करण्यासाठी त्रास दिला. त्यानंतर पतीने अमेरिकेत बोलावून घेऊन तेथे छळ सुरु केला. शेवटी तरुणीने अमेरिकन पोलिसांच्या मदतीने स्व: तची सुटका करुन घेतली. त्यानंतर आता ही नवविवाहिता पुण्यात आल्यावर तिने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी लव वर्मा (सध्या रा. अमेरिका), अरुण वर्मा, परविन ऊर्फ अरुण वर्मा, कुश वर्मा (सर्व रा. खारघर, नवी मुंबई) विधु वर्मा आणि डॅनियल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नवी मुंबईतील खारघर तसेच अमेरिकेत १ डिसेबर २०२२ पासून आतापर्यंत घडला आहे. याबाबत एका ३३ वर्षाच्या विवाहितेने डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे लव वर्मा यांच्याबरोबर प्रेम संबंध होते. तो तिच्या खात्यातून वेळोवेळी पैसे घेत असत. त्यानंतर त्यांनी दोन्ही परिवाराच्या संमतीने आंतरजातीय विवाह करण्याचे ठरले. ३० मार्च २०२२२ रोजी हॉटेल कॉनरॅड येथे साखरपुडा झाला. त्यासाठी १० लाखांचा खर्च फिर्यादीच्या वडिलांनी केला. यावेळी हिंदु धर्मातील शुभ संकेत म्हणून फिर्यादीच्या नातेवाईकांनी मुलाच्या आईवडिलांना चांदीची गणेश मुर्ती दिली. त्यावरुन नणंदेचा पती डॅनिअल याने वाद घातला. त्यानंतर डिसेबरमध्ये अलिबागला डेस्टिनेशन वेडिंगवर ७५ लाख रुपये खर्च केला. हुंडा म्हणून ५० हजार डॉलर देण्यात आले. लग्नात पतीच्या आईस व दोन बहिणीना प्रत्येकी ५ तोळ्यांचा सोन्याचा हार देण्यात आला. 

नणंदेच्या पतीने तू खिश्चन धर्म स्वीकार असे सप्तपदी सुरु असताना सांगितले. त्याला नकार दिल्यावर तो रागाने निघून गेला. लग्न झाल्याने त्यांनी नववधुला सासरी नेण्याऐवजी आजीकडे पाठविले. गोव्याला ५ स्टार हॉटेलमध्ये हनिमून पॅकेजची मागणी पुरविली. त्यानंतर तिचा गृहप्रवेश साध्या पद्धतीने करण्यात आला.तिचा छळ होऊ लागल्याने ती माहेरी परत आली. त्यानंतर तिचा पती अमेरिकेला निघून गेला. आमच्या घरात पाऊल ठेवू नकोस, अमेरिकेत आली तर तुझे पाय तोडून टाकेल, हे लग्न मोडले आहे, असे सांगितले.

त्यानंतर साखरपुड्यावेळी पतीचा जुळा भाऊ कुश याने केलेल्या कृत्याबाबत तिने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ही तक्रार मागे घ्यावी यासाठी त्यांनी आम्ही त्रास देणार नाही़ तु अमेरिकेत ये, आपण आपले लग्न टिकवूया असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी १४ फेब्रुवारी २०२३ रोजी अमेरिकेला गेली. तेथे पोहचताच पतीने त्रास देण्यास सुरुवात केली. माझ्या भावाविरोधात दिलेली तक्रार अगोदर मागे घे. तरच मी तुला नांदवतो, असे म्हणून तिला जेवण देणे बंद केले. घरामध्ये कोणतीही जीवनावश्यक वस्तू ठेवली नाही. तिला पुन्हा नवीन टिव्ही खरेदी करण्यास लावला. तिला क्रूर वागणूक दिली. शेवटी तिने अमेरिकेतील पोलिसांना ९११ वर कॉल करुन मदत मागितली. पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली. सध्या तो जामिनावर आहे. तिचे वडिल अमेरिकेला गेले. तिला पुण्यात आणल्यानंतर आता त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PuneपुणेAmericaअमेरिकाPoliceपोलिसmarriageलग्नSocialसामाजिक