पुण्यातल्या जंबो कोविड सेंटर मध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांचा त्रास. उपचार थांबवण्याचा डॉक्टरांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 10:56 AM2021-04-24T10:56:11+5:302021-04-24T12:33:12+5:30
कॉन्ट्रॅक्ट साठी त्रास देत असल्याचा आरोप. महिला डॉक्टर ला कोसळलं रडू
जम्बो कोव्हीड हॅास्पिटल मध्ये महापालिकेतल्या माननीयांनी चक्क पालिकेच्याच डॅाक्टरला धमकावण्याचा प्रकार घडला आहे . यामुळे त्रासलेल्या डॅाक्टरला महापौरांसमोर अक्षरश: रडु कोसळले. जम्बो मधले जेवणाचे कंत्राट मिळवण्यासाठी हा सगळा प्रकार केल्याचा आरोप केला जात आहे. पण अशा परिस्थितीत काम करायचं तरी कसं असा सवाल जम्बोतले डॅाक्टर विचारत आहेत.
पुण्यातल्या जम्बो कोव्हीड सेंटर मध्ये जात महापालिकेच्या काही पदाधिकाऱ्यांनी इथल्या डॅाक्टर आणि संचालकांना धारेवर धरले. यातल्या एका माननीयांची भाषा तर अशी होती की महापालिकेची समन्वयक डॅाक्टर म्हणून काम करणाऱ्या या महिलेला अक्षरश: रडु कोसळले. या सगळ्या प्रकाराची तक्रार घेवुन डॅाक्टरांनी थेट महापालिका गाठत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यातले एक माननीय हे वारंवार त्रास देत असल्याचा आरोप महिला डॅाक्टर ने केला.
जम्बो मधील सूत्रांचा नुसार या संबंधीत पदाधिकाऱ्यांनी "तुम्हाला इथे काम करायचं असेल तर असाच करावं लागेल. नाहीतर तुमची बिल कशी निघतात ते मे बघतोच. आयुक्तांकडून सगळ्यांना सूचना गेलेल्या आहेत".अशा शब्दात धमकी दिली.
महापालिकेकडुन चालवल्या जाणाऱ्या जम्बो मध्ये जेवणाचे कॅान्ट्रॅक्ट मिळवण्यासाठीच हा सगळा प्रकार सुरु असल्याची चर्चा आहे. महत्वाचे म्हणजे सध्या १८० रुपयांनी जेवण मिळत असताना एका कार्यकर्तीला हे कॅानट्रॅक्ट ३०० रुपयांवर हवे आहे. त्यामुळेच हा धमकावण्याचा प्रकार झाल्याची चर्चा आहे.
या प्रकाराला वैतागून डॅाक्टरांनी काम बंद करण्याचा देखील इशारा दिला होता. मात्र उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता हा निर्णय मागे घेण्यात आला.
दरम्यान याविषयी स्पष्टीकरण देताना कॅांग्रेस चे नगरसेवक आणि गटनेते आबा बागुल म्हणाले “ या रुग्णालयात जवळपास १५० कॅाट विनावापर पडुन आहेत. तसेच इथले सिक्युरिटी गार्ड हे पेशंट ला न तपासात परस्पर पाठवून देत आहेत. यामध्ये रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. त्याचा जाब आम्ही विचारायला गेलो होतो. कंत्राट आणि इतर कुठल्या कामाचा काहीही संबंध नाहीये”