शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कठोर मेहनतीला स्मार्ट वर्कची जोड हवी : मयूर सूर्यवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:09 AM

(एकेक किरण तेजाचा लोगो) इन्ट्रो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत अपयश येऊनही न खचता, प्रत्येक प्रयत्नावेळी झालेल्या चुका सुधारून ...

(एकेक किरण तेजाचा लोगो)

इन्ट्रो

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत अपयश येऊनही न खचता, प्रत्येक प्रयत्नावेळी झालेल्या चुका सुधारून पुन्हा नव्याने तयारी केली. त्यामुळे पहिल्या दोन पूर्वपरीक्षेत अपयश आल्यानंतर, तिसऱ्या प्रयत्नात पूर्व, मुख्य परीक्षा पास करत थेट मुलाखतीपर्यंत झेप घेतली. मात्र, थोडक्यात पुन्हा संधी हुकली. अपयश हे स्पर्धा परीक्षेचा एक भागच आहे असे मानून त्यामुळे हार न मानता पुन्हा जोमाने तयारी सुरू केली. चौथ्या प्रयत्नात कठोर मेहनतीला स्मार्ट वर्कची जोड देत अभ्यास केला. त्यामुळे थेट जिल्हाधिकारीपदी निवड झाल्याचे मयूर विकास सूर्यवंशी यांनी सांगितले. सध्या ओडिशा राज्यातील संबलपूर येथे ते उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

पुणे विद्यापीठातून बी. ई. (मेकॅनिकल)ची पदवी मिळवलेले मयूर सूर्यवंशी मूळचे जळगाव जिल्ह्यातील आहेत. आईवडील, शिक्षक असल्याने कायम त्यांचा पाठिंबा मिळाला. त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी पुणे आणि दिल्ली येथून केली आहे. वरिष्ठ अधिकारी मित्र, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आईवडिलांच्या पाठिंब्यामुळेच हे यश मिळवल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

* परीक्षा पद्धत समजून घेऊन अभ्यासाचे नियोजन करा :

आयोगाने दिलेला अभ्यासक्रम सुरुवातीला समजून घ्या, गेल्या १० वर्षांतील पूर्व आणि मुख्य परीक्षेचे पेपर अभ्यासने, त्याचे आकलन करणे, वेळेचे अभ्यास सुरू करण्याआधी अचूक नियाेजन करणे, दिवसातून कमीत कमी १० तास अभ्यास करणे गरजेचे आहे. पूर्व परीक्षेवेळी कोणताही विषय वैकल्पिक (ऑप्शनलला) न टाकता संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच, चालू घडामोडींचे आकलन व माहिती ठेवण्यासाठी कुरूक्षेत्र, योजना या मासिकांचा नियमित अभ्यास करावा, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी भरपूर सराव, कमीत कमी ५० पेपर तरी सोडवणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमाची कमीत कमी ३ वेळी उजळणी करावी. विविध विषयांवर मित्रांबराेबर ग्रुप स्टडीमधून केलेला अभ्यास मुख्य परीक्षेला फायदेशीर ठरतो. स्वत:ची उत्तरे प्राध्यपकांकडून, मित्रांकडून तपासून घ्यावी, त्यात सुधारणा करणे. मागील वेळी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळा, योगा, ध्यान नियमितपणे करा, त्यातून मन एकाग्र होते अन् केलेल्या अभ्यास लक्षात राहतो. त्याचबरोबर सातत्य, चिकाटी आणि मेहनत ही त्रिसूत्री कायम लक्षात ठेवून वाटचाल केल्यास यश हमखाश मिळेल.

* सोशल मीडियाचा योग्य वापर करा :

यूपीएससीची तयारी करताना संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वेळेचे नियोजन म्हत्त्वाचे असते. त्यासाठी तुम्हाला इतर गोष्टींना मुरड घालावी लागते. सोशल मीडियाचा यासाठी जपून वापर करणे गरजेचे आहे. अभ्यास करताना आम्ही व्हॉटस्ॲपवर पूर्व, मुख्य आणि मुलाखतीच्या प्रत्येक टप्प्यावर विषयानुसार ग्रुप बनवले होते. त्या माध्यमातून शिक्षकांबरोबरच यशस्वी आणि सध्या कार्यरत असलेले अधिकारी आम्हाला या माध्यमातून सहज मार्गदर्शन करायचे. त्यामुळे कोणत्याही क्षणी काही अडचण आली की, या ग्रुपचा आम्हाला मोठा फायदा व्हायचा. लोकसभा व राज्यसभा वृत्तवाहिनीवरील विविध विषयांवरच्या चर्चाही ऐकल्यास त्याचाही फायदा होताे. त्यामुळे मी किंवा माझ्या सर्व मित्रांनी सोशल मीडियाचा विधायक वापर केल्याने आम्हाला त्याचा चांगला फायदा झाला आहे.

(फोटो : मयूर सूर्यवंशी आयएएस या नावाने आजच्या फोल्डरमध्ये टाकला आहे)