शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

पुण्याच्या पाणी नियोजनासाठी तारेवरची कसरत : १५ जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 12:43 PM

पालिकेला आणि जलसंपदा विभागाला पुढील सात महिन्यांचे पाण्याचे नियोजन करण्यासाठी चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

ठळक मुद्देखडकवासला प्रकल्पात १८.२६ टीएमसीेच पाणीपरतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माणपालिकेने १३५० एमएलडी पाणी वापरले शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडता येणार नाही,अशी स्थिती

पुणे: खडकवासला धरण प्रकल्पात मागील वर्षापेक्षा तब्बल पाच टीएमसी पाणीसाठा कमी असूनही पुणे महापालिकेकडून सध्या १३५० एमएलडी पाण्याचा वापर केला जात आहे. मात्र, पालिकेने दररोज एवढेच पाणी वापरले तर १५ जुलैपर्यंत धरणात पाणीच शिल्लक राहणार नाही.परिणामी पालिकेला आणि जलसंपदा विभागाला पुढील सात महिन्यांचे पाण्याचे नियोजन करण्यासाठी चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.खडकवासला धरण प्रकल्पात सोमवारी (दि.२४) केवळ १८.२६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता.परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.त्यात जलसंपदा विभाग आणि पालिका प्रशासनातील वादाला अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही.पालिकेने १३५० एमएलडी पाणी वापरले शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडता येणार नाही,अशी स्थिती आहे.त्यामुळे पालिकेने ११५० एमएलडीपाणी वापरावे,अशी सूचना जलसंपदा विभागाने पालिकेला केली आहे.परंतु,त्यावर कोणताही निर्णय होत  नसल्याने जलसंपदा विभागाला पाण्याचे नियोजन करताना अनेक अडचणी येत आहेत.त्यातच गेल्या आठ वर्षाचा विचार करता २०१५ वगळता खडकवासला धरण प्रकल्पात सर्वात कमी पाणीसाठा आहे.जलसंपदा विभागातर्फे 15 जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन केले जाते. त्यातही १५ जुलैपर्यंत पाऊस न पडल्यास १५ ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणात ठेवावा लागतो. त्यामुळे 15 जुलैनंतरही धरणात २ ते २.५ टीएमसी पाणीसाठी असणे आवश्यक आहे. परंतु, पिण्यासाठी लागणारे पाणी, कृषीसाठी सोडले जाणारी पाणी आणि बाष्पीभवनामुळे कमी होणारा धरणातील पाणीसाठा याचा विचार केला. तर सध्यस्थितीत धरणातील पाणी कमी पडत आहे. एका वर्षापूर्वी धरण प्रकल्पात २४ डिसेंबर २०१५ रोजी १२.८८ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक होता.मात्र,त्यावेळी पालिकेकडून मानसी ३०३ एलपीसीडी (दरडोई ) पाण्याचा वापर केला जात आहे. परंतु, २०१८ मध्ये मानसी ३५६ एलपीसीडी पाणी वापरले जात आहे.तसेच २४ डिसेंबर २०११ रोजी सुध्दा धरणात केवळ १९.७२ टीएमसी एवढाचा पाणीसाठा होता. त्यावेळीही पाण्याचा वापर काटकसरीने करण्यात आला होता. परंतु, सध्यस्थितीत पाणी वापराबाबत कोणतीही काटकसर केली जात नसल्याने जलसंपदा विभागाला पाण्याचे नियोजन करताना अडचण येत आहे.------------------------

उपलब्ध पाणीसाठा आणि वापरले जाणारे पाणी

पाटबंधारे विभागाला दुसरे रब्बीचे आवर्तन आणि उन्हाळी आवर्तन असे एकूण सुमारे ७.५ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे.तसेच पालिकेकडून सध्या वापरल्या जात असलेल्या पाण्याचा विचार करता पिण्यासाठी तब्बल ९.५० ते १० टीएमसी पाणी द्यावे लागेल.त्याचप्रमाणे सुमारे २ ते २.५ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होणार आहे.त्यातच सर्व पाणी संपणार आहे. मात्र,शेतक-यांनी व पालिकेने प्रत्येकी एक टीएमसी पाणी कमी वापरले तरच १५ जुलैपर्यंतचे पाण्याचे नियोजन करणे शक्य होणार आहे.

खडकवासला धरण प्रकल्पाची २४ डिसेंबर रोजीची ८ वर्षांची आकडेवारी दिनांक         धरणसाठा २४/१२/२०११        १९.७२२४/१२/२०१२        २०.१२२४/१२/२०१३        २२.६८२४/१२/२०१४        २२.०३२४/१२/२०१५        १२.८८२४/१२/२०१६        २१.८३२४/१२/२०१७        २२.९६२४/१२/२०१८        १८.२६---------------------------------खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा (१८.२६)खडकवासला-१.१६,पानशेत- ७.२८,वरसगाव-९.६९,टेमघर -०.१३,

 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका