पुणे : ताम्हिणी अंधारबन हे ट्रेकर्सचे अत्यंत आवडीचे ठिकाण आहे. इथल्या दुर्गम भागात हिरडी हे छोटेसे गाव वसलेले आहे. विजेच्या तारा तुटल्यामुळे अनेक महिन्यांपासून खंडित झालेला वीजपुरवठा गावकºयांनी खूप प्रयत्न करूनही सुरू होत नव्हता. गावकºयाने एका ट्रेकर्सशी बोलताना ही खंत बोलून दाखविली. त्यानंतर त्या ट्रेकर्सने दोन महिने सातत्याने पाठपुरावा करून अखेर त्या गावचा वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत करून दिला. या छोट्याशा कृतिशील प्रयत्नाने त्या गावकºयांची दिवाळी मात्र खरीखुरी प्रकाशमान झाली.राकेश जाधव असे त्या कृतिशील ट्रेकरचे नाव आहे. औंधमधील सहयाद्री ट्रेकर्स ग्रुपचे राकेश सदस्य आहेत. त्यांनी सांगितले, ‘‘अंधारबन इथे ट्रेकिंगला गेलो असता हिरडी गावातले गावकरी भेटले. सहज गप्पांमध्ये त्यांनी विजेच्या तारा तुटल्यामुळे गेल्या ३ महिन्यांपासून गावात लाईट नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागत होता. संबंधित अधिकाºयांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही त्यांना दाद दिली जात नव्हती. या गावाला पूर्ववत वीज मिळवून देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, असे त्याचवेळी ठरविले. त्यानंतर पुण्याला परत आल्यावर त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. महावितरणच्या अधिकाºयांचे फोन नंबर, ई-मेल शोधले. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना याची माहिती दिली. त्यानंतर पालकमंत्री, ऊर्जा विभागातील अधिकारी यांना याबाबतचे ई-मेल पाठविले.’’पंधरा दिवसांनी हिरडी गावाशी संबंधित असलेल्या अधिकाºयांचा राकेश यांना फोन आला. तुम्ही कोण आहात, हिरडी गावाशी तुमचा काय संबंध अशी विचारणा अधिकाºयाने त्यांना केली. तुम्ही केलेल्या तक्रारीमुळे वरिष्ठ अधिकाºयांकडून दटावणी झाल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर गावचा वीजपुरवठा सुरळीत झाला असून आता आमच्या अधिकाºयांना ई-मेल पाठवून ते कळवा, अशी विनंती त्याने राकेश यांना केली. जे काम काही दिवसांत होऊ शकत होते, ते शासकीय अनास्थेमुळे महिनोन्महिने रखडले होते.>असं आहे छोटंसं हिरडी गावअंधारबनच्या दुर्गम भागात वसलेल्या हिरडी गावात पूर्वी १८ घरे होती. पण सुख-सुविधांच्या अभावामुळे आज तेथे फक्त ८ कुटुंबे राहत आहेत. बाकीचे पुण्या-मुंबईला स्थलांतरित झाले आहेत. पिण्याचे पाणी गरजेपुरते उपलब्ध आहे. इथे भात, नाचणी व वरई ही पिके घेतली जातात. बाजारहाट करण्यासाठी दोन तासांची दमछाक करणारी खडतर चढाई पार करून ते सामान आणावे लागते. सोमजाईदेवी ग्रामदैवत आहे. महाशिवरात्री, नवरात्री, गौरी-गणपती व दिवाळी कामानिमित्त बाहेरगावी गेलेले लोक आवर्जून येतात.>तक्रारीची दखल घेतल्याचा आनंदनिसर्गसौंदर्याची मुक्त उधळण म्हणजे अंधारबन. आमचा ट्रेक रमतगमत मजेत पूर्ण झाला होता. पण केवळ विजेच्या तारा जोडल्याने अनेक अडचणींचा सामना करीत असलेल्या हिरडी गावच्या विजेची समस्या अस्वस्थ करीत होती. या तुटलेल्या तारा दुरुस्त करून देण्यासाठी माझ्या पातळीवर वैयक्तिक प्रयत्न करण्याचे मी ठरविले. त्यानुसार केलेल्या प्रयत्नांना यश येऊन त्या गावचा वीजपुरवठा सुरळीत झाल्याचा आनंद आहे. शासकीय यंत्रणेकडे केलेल्या तक्रारीची दखल घेतली गेल्याचा सुखद अनुभव यानिमित्ताने आला.- राकेश जाधव, ट्रेकर
हिरडी गाव प्रकाशमय, छोटीशी कृती ठरली लाख मोलाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:54 AM