तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्ता हरीश महादू कानसकर याच्याविरोधात मंचर पोलिस ठाण्यांमध्ये एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये पाच गुन्हे खंडणीचे, एक गुन्हा गुटखा विक्री, एक गुन्हा दारूविक्री, सात इतर गुन्हे आहे. सात गुन्ह्यांमध्ये अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी कानसकर याने खेड आणि जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. कानसकर याला सर्व खंडणीच्या प्रकरणांमध्ये पोलीस कोठडी आवश्यक आहे. खंडणी म्हणून स्वीकारलेली रक्कम जप्त करणे आवश्यक आहे. इतर गुन्हे प्रलंबित या स्वरूपाचे असून अजून गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून कानसकर हा फरार आहे.त्याच्याकडे तपास करायचा आहे. असा युक्तिवाद अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश ए. एम.अंबळकर यांनी अटकपूर्व जामीन नामंजूर केला आहे. न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना सर्व गुन्ह्यातील तपास अधिकारी मंचर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे युक्तिवादासाठी हजर होते.
हरीश कानसकरच्या अटकेचा मार्ग मोकळा,अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:12 AM