उपमुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
उपमुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
बारामती : बारामती शहरात ‘हरित बारामती- हरित तांदूळवाडी ’ संकल्पनेतून तांदूळवाडी परिसरात नवीन होत असलेल्या रस्त्यालगत या वर्षी ५०० मोठी झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. येथील नगरसेवक जय पाटील यांच्या संकल्पनेतून विशेषत: ऑक्सिजन पार्कच्या दृष्टीने हे नियोजन करण्यात येत आहे.यामध्ये पूर्ण देशी झाडांची लागवड आणि संगोपन करण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांनी थेट या ठिकाणी भेट देऊन वृक्षलागवडीची माहिती घेतली. ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या देशी झाडांच्या लागवडीची संकल्पना पवार यांना चांगलीच भावली. पवार यांना अपेक्षित उपक्रम राबविल्याने त्यांनी नगरसेवक पाटील यांची पाठ थोपटली आहे.
या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण उपमुख्यमंत्री पवार यांच्याहस्ते जिजामातानगर तांदूळवाडी या ठिकाणी पार पडला. यावेळी बोलत असताना पवार यांनी नगरसेवक पाटील यांचे पाटस रस्ता जोडणाऱ्या रिंगरोडला लावलेल्या झाडांचे व तांदूळवाडीतील लावलेल्या झाडांचे कौतुक केले. तांदूळवाडी या ठिकाणी दहा एकरांमध्ये होत असलेल्या उद्यानाच्या कामाबाबत संबंधितांकडे विचारणा केली. लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. या कार्यक्रमाच्या वेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर,मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मिलिंद बारभाई आदी उपस्थित होते.
बारामती शहरात ‘हरित बारामती हरित तांदूळवाडी ’उपक्रमाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली.यावेळी उपस्थित नगरसेवक जय पाटील आणि अन्य.
२२०६२०२१ बारामती—२७
बातमी २२ जुलैच्या दृष्टीने फोटोसह आवश्यक