लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. खून, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर घटना घडत असताना दुसरीकडे आत्महत्येसारख्या घटनांचे प्रमाणही वाढू लागले आहे. परीक्षेतील अपयश, बेरोजगारी, तणाव यातून येणाऱ्या नैराश्येपोटी आत्महत्या होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पतीला चांगल्या पगाराची, शास्वत नोकरी, घरात सुखांची रेलचेल असताना, विवाहिता आत्महत्या करू लागल्या असल्याचे अलीकडील ताज्या घटनांमधून प्रत्ययास आले आहे. पोटच्या मुलांचा गळा घोटून स्वत:ची जीवनयात्रा संपविण्यापर्यंतची मजल मारली असल्याने ही चिंतेची बाब आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमोदी इसापन (वय २५, रा. सध्या भोसरी, मूळ केरळ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी या महिलेने गळा आवळून पोटच्या मुलीची हत्या केली़ त्या चार वर्षांच्या मुलीचे नाव देवाश्री असे आहे. इसापन दाम्पत्य इंद्रायणीनगर, भोसरी येथे राहत होते. चाकण येथील एका कंपनीत कोमोदीच्या पतीने मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांची एक प्रकारची स्वतंत्र कंपनीच आहे. नेहमीप्रमाणे ते सकाळी चाकणला कंपनीत गेले. चाकण येथे गेल्यानंतर त्यांना काही वेळाने घरी घडलेल्या प्रकाराची माहिती मिळाली. ते घरी परतले. पत्नी आणि मुलगी दोघीही गळफास लावलेल्या अवस्थेत त्यांना पहावयास मिळाल्या.विवाहित महिलांच्या आत्महत्येच्या घटना वाढत आहेत. कौटुंबिक वादातून या घटना घडल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे.
विवाहिता झाल्या जीवावर उदार
By admin | Published: June 30, 2017 3:39 AM