हर्षवर्धन पाटलांची कन्या निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेसकडून तिकीट जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 07:36 PM2019-06-05T19:36:58+5:302019-06-05T22:00:28+5:30

पाटील कुटुंबात माजी खासदार दिवंगत शंकरराव पाटील यांच्यानंतर त्यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील यांचा राजकारणात प्रवेश झाला होता.

Harshavardhan Patil's daughter contest election from congress in indapur | हर्षवर्धन पाटलांची कन्या निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेसकडून तिकीट जाहीर

हर्षवर्धन पाटलांची कन्या निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेसकडून तिकीट जाहीर

googlenewsNext

पुणे - काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला आहे. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी अंकिता यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता बावड्याच्या पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे.

पाटील कुटुंबात माजी खासदार दिवंगत शंकरराव पाटील यांच्यानंतर त्यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील यांचा राजकारणात प्रवेश झाला होता. त्यानंतर आता त्यांच्या कन्येच्या प्रवेशामुळे पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात दाखल झाली आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता अंकिता पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंसाठी धावपळ करणाऱ्या अंकिता पाटील यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीनेही पाठींबा जाहीर केला आहे. 

काँग्रेसच्या सदस्या आणि हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या जागेवर 23 जून रोजी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी काँग्रेसकडून अंकिता पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

अंकिता पाटील यांचे शिक्षण परदेशात झाले आहे. शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजोपयोगी शैक्षणिक कार्य त्यांनी सुरू केले आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नवी दिल्लीच्या त्या सदस्या आहेत.

Web Title: Harshavardhan Patil's daughter contest election from congress in indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.