लोकमत न्यूज नेटवर्क
कळस : कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी एकूण ११५ अर्जांची विक्री झाली. एकूण ९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवार (दि २४) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी गर्दी उसळण्याची शक्यता आहे.
माजी सहकार मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी कालठण गट व ब वर्गामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, उपस्थित होते. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल झालेल्यांमध्ये व्यावहारे मदन श्रीरंग, फलफले गुलाबराव मारुती, देवकर विष्णू दिंगबर, वाघ यशवंत मुंकुदराव, जगताप जगन्नाथ लाला, आढाव बलभीम बापू यांचा समावेश आहे.
बुधवारी ७० अर्जाची विक्री झाली होती. तर एक अर्ज दाखल करण्यात आला होता. गुरुवारी ४५ अर्ज विक्री झाली आहे. ७ उमेदवारांनी ८ अर्ज दाखल केले आहेत. भाजप व राष्ट्रवादीची पक्षीय भूमिका यावर इच्छुकांची आशा आहे. भिगवण गट ३, कालठण गट ३, इंदापुर गट १, अनुसूचित जाती जमाती गट १, ब वर्ग १ असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
तालुक्यातील इंदापूर,कालठण, पळसदेव,भिगवण,शेळगाव या पाच गटांमधून प्रत्येकी ३ संचालक, भटक्या जमाती प्रवर्ग १,मागास प्रवर्ग १,अनुसूचित जमाती १,महिला राखीव २आणि ब वर्ग १ असे एकूण २१जागांसाठी ही निवडणूक होणार आहे
फोटो ओळी,
कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.