अवसरी रस्त्यावर असलेल्या गोविंद बाळासाहेब निंबाळकर या शेतकऱ्याच्या जनावरांच्या गोठ्यास रविवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने गोठा जळून ४ गाई मृत्युमुखी पडल्या तर इतर ३ जनावरे जखमी झाली आहेत.
यावेळी घटनास्थळावरून हर्षवर्धन पाटील यांनी महसूल, वीज मंडळ, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या तालुक्यातील व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क करून जनावरे मृत झाल्याने गोविंद निंबाळकर यांना तातडीने शासकीय मदत व सहकार्य करण्याच्या सूचना केल्या. त्या अधिकाऱ्यांनी मान्य केल्या. तसेच यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले. यावेळी पशुधन अधिकारी डॉ. बी. एस. घुगे व शेतकरी उपस्थित होते.
वडापुरी येथील शेतकऱ्याच्या जनावरांच्या जळीतग्रस्त गोठ्याची पाहणी करताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व इतर.