बिजवडी : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीबाबत राज्यसरकार गंभीर नसून उजनीच्या पाण्याचे व्यवस्थापन नाही. सर्व सभासदांनी केलेल्या सहकायार्मुळे कर्मयोगीने आतापर्यंत ९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. गळपात कर्मयोगी जिल्ह्यात क्रमांक एकला असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.लोणी देवकर (ता. इंदापूर) येथील थोरात वस्ती येथे दत्तात्रय थोरात यांनी स्वखचार्ने बांधलेल्या दत्त मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा समारंभ (दि.७) आयोजित केला होता. यावेळी हभप अंकुश महाराज माने (न्हावी) यांचे काल्याचे कीर्तन झाले. तसेच सर्व विधिवत पुजा करून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते दत्त मूतीर्ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.यावेळी झालेल्या भाषणात पाटील म्हणाले पूर्वी इंदापूर हा दुष्काळी भाग होता मात्र कर्मयोगी भाऊंनी त्यावेळी केलेल्या नियोजनामुळे तसेच सर्व सभासद वर्गाने केलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाले. तसेच सध्याच्या दुष्काळी परिस्थितीबाबत सरकार गंभीर नाही. उजनीच्या पाण्यावर कोणाचे नियंत्रण नाही. आपल्याला खडकवासल्याचे पाणी मिळत नाही. कर्मयोगी महिनाअखेर तिन्ही २ पंधरवडा चे पेमेन्ट करणार आहे. तसेच आपण केलेल्या सहकायार्मुळे कर्मयोगी आज अखेर ९ लाख मेट्रीम टन उसाचे गाळप केल आहे. नक्कीच कार्यक्षेत्रातील सर्व गाळप पूर्ण करणार तसेच कर्मयोगी गाळपाच्या बाबतीत देखील पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगितले.कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुरविल्या जाणाºया सोयी, ऊसतोड कामगार यामुळे या कारखान्यात ऊस देण्यासाठी परिसरात शेतकºयांची जणू स्पर्धा लागते. त्या प्रत्येकाचा ऊस जावा यासाठी कारखाना प्रयत्नशील असून त्यांना चांगला भाव देण्याचा प्रयत्न आहे.यावेळी दत्तात्रय थोरात, सचिन थोरात, वनाधिकारी दोरगे, भूषण काळे, सुभाष भोसले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
गाळपात ‘कर्मयोगी’ जिल्ह्यात प्रथम, हर्षवर्धन पाटील यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 11:47 PM