बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला थेट विरोध केला असता युतीच्या जागावाटपात इंदापूरची जागा शिवसेनेकडे असल्याने हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याबाबत स्वत: कोणतेही वक्तव्य केलेले नाही. कार्यकर्त्यांकडूनच त्यांनी ‘भाजप’ असे वदवून घेतले. युतीमध्ये पुन्हा जागावाटपाचा तिढा नको म्हणून शिवसेना-भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून लढण्याचीच पाटील यांची इच्छा असल्याची चर्चा आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर पाटील यांनी बुधवारी घेतलेल्या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर लबाडी व फसवेगिरीचा आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकही केले. मात्र, स्वत:ची भूमिका जाहीर केली नाही. विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीच्या तिकीटवाटपात आमदार दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये रस्सीखेच आहे. विजयी उमेदवार असल्याने राष्ट्रवादीने प्रबळ दावेदारी केली आहे. दिल्लीत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांमध्ये होणाºया बैठकीत निर्णय होणार आहे. पाटील यांना आघाडीची उमेदवारी मिळाली तर मात्र त्यांचा भाजपप्रवेश थांबू शकतो. मात्र, तरीही आघाडीची उमेदवारी पाटील यांना मिळाल्यास भाजप भरणे यांनाच गळ टाकून पाटील यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यात पक्ष बदलले तरी पाटील आणि भरणे यांच्यातच प्रमुुख लढत होणार आहे. इंदापूर मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादमध्ये विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. आघाडीतील घटक असूनदेखील या दोन्ही पक्षांतील नेतेमंडळींचे मनोमिलन कधी झालेच नाही. लोकसभा वगळता इतर निवडणुकांमध्ये एकमेकांविरोधात स्थानिक नेतेमंडळीच नेहमीच शड्डू ठोकतात............भोर, पुरंदरमध्ये राष्ट्रवादीची काँग्रेसला चाल?पुरंदर तालुक्याच्या राजकारणात आतापर्यंत जगताप यांच्याशी राष्टÑवादीचे कधीही पटले नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीत आघाडीकडून उमेदवारी मिळूनही राष्ट्रवादीचे लक्ष्मण जगताप यांनी बंडखोरी करून त्यांचा पराभव केला. यंदा मात्र राष्ट्रवादीने कॉँग्रेसला चाल देण्याची तयारी केली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्यासाठी जागा सोडण्याची तयारी सुरू आहे. भोरमध्ये तर काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात काम केल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. तरीही ही जागा कॉँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादी तयार असल्याचे समजते. जगताप, थोपटे यांना हाताशी धरून हर्षवर्धन पाटील यांना एकटे पाडण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. ...जुन्नरमध्ये अतुल बेनके यांची भूमिका महत्त्वाची ठरणारशिरूर लोकसभा मतदारसंघातील एकमेव जुन्नरमध्ये काँग्रेसची ताकद आहे. मात्र, आजपर्यंत राष्ट्रवादीने ही जागा ग्रेसला सोडली नाही. मात्र, खासदार अमोल कोल्हे यांच्याशी असलेली मैत्री आणि लोकसभा निवडणुकीत केलेले प्रामाणिक काम यामुळे शेरकर यांच्यासाठी ही जागा सोडण्याच्या तयारीत राष्ट्रवादी आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले अतुल बेनके यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. .....
हर्षवर्धन पाटील यांची सावध भूमिका! कोल्हेंच्या मैैत्रीचा शेरकरांना फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 12:01 PM
हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याबाबत स्वत: कोणतेही वक्तव्य केलेले नाही. कार्यकर्त्यांकडूनच त्यांनी ‘भाजप’ असे वदवून घेतले.
ठळक मुद्देभाजपप्रवेशाची घोषणा नाही : इंदापूरची जागा शिवसेनेकडे असल्याने तिढा पुरंदरची जागा जगताप यांच्यासाठी सोडणारजुन्नरमध्ये अतुल बेनके यांची भूमिका महत्त्वाची ठरणारभोर, पुरंदरमध्ये राष्ट्रवादीची काँग्रेसला चाल?