हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने शरद पवार गटात नाराजी? इंदापूरच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार बदलण्याची केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 18:09 IST2024-10-11T18:02:50+5:302024-10-11T18:09:12+5:30
Harshvardhan Patil : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसापूर्वी भाजपामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने शरद पवार गटात नाराजी? इंदापूरच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार बदलण्याची केली मागणी
Harshvardhan Patil ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला काही दिवसातच सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या पक्षांतराला सुरुवात झाली. काही दिवसापूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. दरम्यान, आता इंदापूरातील राष्ट्रवादीतील काही कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या प्रवेशावरुन नाराजी व्यक्त केली आहे. आज इंदापूरात प्रवीण माने यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त केली.
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा
हार्षवर्धन पाटील यांनी प्रवेश केल्यानंतर इंदापूरातील तीन नेत्यांनी विरोध केला. आज या नेत्यांनी इंदापूरात परिवर्तन मेळावा घेतला. यावेळी प्रवीण माने यांचीही उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रवीण माने म्हणाले, आज मेळाव्यात प्रमुख ज्येष्ठ नेते बोलले आहेत. लोकांचा मोठा प्रतिसाद आहे. प्रतिसाद असल्यानंतर जनतेच्याविरोधात जाऊन चालत नाही. शेवटी जनता सांगेल तोच निर्णय घ्यावा लागतो. आजपर्यंतच्या इतिहासात मी एवढी मोठी सभा इंदापूर शहरात बघितली नव्हती. मोठे नेते कोण नसतानाही एवढं उत्साहाच वातावरण होतं. आदरणीय शरद पवार साहेब आमचे दैवत होते आणि राहणार आहेत. साहेबांना सल्ला देण्याएवढा मी मोठा कार्यकर्ता नाही.मी छोटा कार्यकर्ता आहे, असंही प्रवीण माने म्हणाले.
"येणारी विधानसभा पक्षाच्या विरोधात लढवायची का? याचा निर्णय आप्पासाहेब जगदाळे, भरतशेठ शहा हे ज्येष्ठ मिळून निर्णय घेतील. यानंतर हा निर्णय होईल, असंही प्रवीण माने म्हणाले.
इंदापूरात हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने शरद पवार गटातील नाराज नेत्यांनी आज इंदापूरातील मार्केट यार्डच्या मैदानात मेळावा घेतला. पाटील यांना उमेदवारी झाल्यानंतर प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे, आणि भरत शहा यांमी नाराजी व्यक्त केली. या तिनही नेत्यांनी हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे आता हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.