पुणे : तुम्ही तुमच्या दैनंदिन कामात गढून गेला असाल, तुम्हाला एखाद्या ब्रेकची गरज अाहे, अाणि तुम्ही त्याच त्याच ठिकाणी जाऊन कंटाळला असाल, तर हे अाहेत पुण्याजवळचे काही भन्नाट पिकनिस स्पाॅट्स. जेथे तुम्ही एका दिवसात जाऊन येऊ शकता अाणि निसर्गसाैंदर्याचा अानंद लुटू शकता, तेही अगदी कमी खर्चात.
लाेहगडपुण्यापासून अवघ्या 52 किलाेमीटर वर हा शिवकालीन किल्ला अाहे. मावळात असलेला हा किल्ला त्याच्या भव्यतेने अापल्या नजरेत भरताे. तुम्ही येथे नाईट ट्रेकही करु शकता. कारने किंवा बाईकवरही तुम्ही अगदी सहज येथे जाऊ शकता. पावसाळ्यातील येथील निसर्गसाैंदर्य काही अाैरच असतं. चहुबाजूकडे हिरवाईने पांघरलेली चादर, किल्ल्याच्या जवळून वाहणारी नदी हे सगळं स्वर्गाची अनुभूती देऊन जातं. हा किल्ला शिवाजी महाराजांनी 1648 मध्ये मुघलांकडून जिंकून घेतला, मात्र 1665 च्या पुरंदरच्या तहात त्यांना ताे परत करावा लागला हाेता. या किल्ल्याचा वापर सुरत वरुन अाणलेली लूट ठेवण्यासाठी करण्यात अाला हाेता.
भाज्या लेणीलाेणावळ्याजवळील मळवली गावात बुद्ध कालीन भाज्या लेणी ही स्थापत्यकलेचा अद्भुत नजराणा अाहे. पुण्यापासून 60 किलाेमीटरवर ही लेणी अाहे. तुम्ही लाेकलनेही या ठिकाणी जाऊ शकता, त्यासाठी तुम्हाला मळवली स्टेशनला उतरुन पायी या लेणीपर्यंत जावं लागेल. डाेंगरात काेरलेली ही संपूर्ण लेणी अाहे. या लेणीमध्ये भन्तेंना ध्यान करण्यासाठीच्या खाेल्या अाहेत. तर मधल्या भागात एक भव्य घुमटकारी बाैद्ध स्तुप अाहे. या लेणीच्या एका बाजूला खाेल दरी अाहे. लेणीच्या पायथ्यापर्यंत तुम्ही तुमच्या वाहनाने जाऊ शकता. मात्र लेणी ही पायऱ्या चढूनच जावी लागते.
रांजण खळगेअहमदनगर मधील निघाेज या गावात निसर्गाची किमया पाहायला मिळते. येथील रांजण खळगे हे जगप्रसिद्ध अाहेत. या ठिकाणी नैसर्गिकरित्या काही कुंड तयार झाले अाहेत. चंद्रावर जसे खड्डे पाहायला मिळतात तसेच खड्डे या ठिकाणी तयार झाले अाहेत. त्यामुळे याला मून लॅंंडही म्हंटले जाते. पुण्यापासून 77 किलाेमीटरवर हे ठिकाण अाहे. या ठिकाणाहून जवळच अण्णा हजारेंचे अादर्शगाव राळेगणसिद्धी अाहे. तसेच दुश्काळ असतानाही पाण्याचे नियाेजन करुन दुष्काळावर मात केलेले असे हिवरेबाजार गावही काही अंतरावर अाहे. त्यामुळे तुम्ही रांजण खळगे साेबतच या अादर्श गावानांही भेट देऊ शकता.
तिकाेणा तुम्ही जर ट्रेकर असाल किंवा तुम्हाला ट्रेकींगची हाैस असेल तर तुम्ही तिकाेणा किल्ला एकदा तरी सर करायलाच हवा. कामशेत जवळ हा किल्ला असून पुण्यापासून 60 किलाेमीटर वर अाहे. याच्या त्रिकाेणी अाकारावरुन या किल्ल्याचे नाव तिकाेणा असे पडले. ट्रेकींगसाठी उत्तम असा हा किल्ला अाहे. या किल्ल्यावरुन मावळ, मुळशी हा संपूर्ण भाग नजरेस पडताे. या किल्ल्च्या चहू बाजूंना माेठ माेठ्या दऱ्या अाहेत. या गडावर पाण्याचे सात माेठे टॅंक अाहेत. जमिनीपासून तब्बल 3 हजार पाचशे 80 मीटर उंचीवर हा किल्ला अाहे. त्यामुळे हा किल्ला चढताना अनेकांची दमछाक हाेते. किल्ल्याला माेठमाेठे दरवाजे अाहेत. या किल्ल्यापासून जवळच पवना धरण तसेच तुंग, विसापूर असे किल्ले सुद्धा अाहेत. त्यामुळे जर येत्या विकेंटला तुम्हचा ट्रेकिंगचा प्लॅन असेल तर या किल्ल्याला नक्की भेट द्या.
लवासा सिटीतरुणाईच्या अाकर्षणाचं केंद्रबिंदू म्हणजे ही लवासा सिटी. पुण्याच्या मुळशी तालुक्यात हे शहर वसविण्यात अाले असून पुण्यापासून अवघ्या 59 किलाेमीटरवर अाहे. कारने किंवा बाईकवरुन तुम्ही सहज या ठिकाणी जाऊ शकता. तब्बल 8 हजार एकरात वसवलेलं हे शहर वेस्टन कल्चरी अनुभूती देते. रंगबेरंगी घरे, बांध घालून तयार केलेेले छाेटेसे तळे मन माेहून टाकते. लवासाकडे जाण्यासाठी घाट पार करावा लागताे. हा घाटाचा रस्ता तरुणांना नेहमीच भुरळ घालताे. कार एेवजी टुव्हीलरवर गेल्यास या घाटातून दिसणाऱ्या निसर्गसाैंदर्याचा अधिक अानंद लुटता येताे. झुनका भाकरी पासून ते चिकन पर्यंत विविध पदार्थ येथे मिळत असल्याने खवय्यांसाठीही एक वेगळीच मेजवाणी असते. त्यामुळे तुम्हाला रिलॅक्स व्हायचे असेल अाणि शांत ठिकाण हवं असेल तर तुम्ही लवासाला भेट नक्कीच द्यायला हवी.