पुणे : जिल्ह्याच्या हगणदरीमुक्तीच्या दिशेने मोठ्या गतीने वाटचाल सुरू असून, मुळशी, भोर, वेल्हे तालुके हगणदरीमुक्त झाल्यानंतर आता हवेलीचाही स्वच्छ तालुका म्हणून गौरव होणार आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्षांनी जिल्हा हगणदरीमुक्त झाल्याशिवाय कुठलेही सत्कार स्वीकारणार नाही, अशी शपथ घेतल्यानंतर तालुक्यातील या मोहिमेने गती घेतली आहे. हवेलीबरोबर खेड आणि पुरंदर या तालुक्यांतही ही मोहीम जोरात सुरू असून, तेही लवकरच हगणदरीमुक्त होतील, असा विश्वास पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल साकोरे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला. १२ मे २0१६ रोजी राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून आपला जिल्हा यंदा हगणदरीमुक्त करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी दौैलत देसाई यांनी जिल्हा ३१ डिसेंबरपर्यंत हगणदरीमुक्त करण्याची घोषणा केली. ३0 सप्टेंबरपर्यंतच टार्गेट पूर्ण करण्याचे ठरविले आहे.मुळशी तालुका यापूर्वीच हगणदरीमुक्त झाला असून, भोर व वेल्हे हे दुर्गम तालुके हगणदरीमुक्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे. भोर तालुक्यात १ हजार ७६४ तर वेल्हे तालुक्यात ४९६ शौैचालयांचे बांधकाम करून हे तालुके हगणदरीमुक्त झाले आहेत.आता हवेली, पुरंदर व खेड या तीन तालुक्यांची वाटचाल हगणदरीमुक्तीच्या दिशेने सुरू आहे. जिल्ह्यात हवेली तालुका हा सर्वाधिक लोकसंख्येचा व मोठा तालुका आहे. तालुका हगणदरीमुक्त करणे तशी अवघड बाब होती. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद हे या तालुक्यातील असून, त्यांचाच तालुका मागे असल्याने तो पहिलांदा स्वच्छ करणे गरजेचे होते. त्यानुसार कंद यांनी तालुक्यात या मोहिमेला गती देत आपला तालुका हगणदरीमुक्तीच्या तोंडावर आणून ठेवला आहे. तालुक्यात १ लाख २७0 कुटुंबांपैैकी ९८ हजार ६0८ कुटुंबांकडे शाच्ौालये असून, १ हजार ६६२ कुटुंबे शिल्लक आहेत. ९८.३४ टक्के टार्गेट पूर्ण झाले आहे. त्यानंतर पुरंदर तालुक्यात ३४ हजार ३४0 कुटुंबांपैैकी ३१ हजार ८३१ कुटुंबांकडे शौैचालये असून, २ हजार ५0९ कुटुंबे बाकी आहेत, तर खेड तालुक्यात ५९ हजार ४९७ कटुंबांपैैकी ५६ हजार ३७१ कटुंबांकडे शौैचालये आहेत. हे दोन्ही तालुके लवकरच हगणदरीमुक्त होऊ शकतात. (प्रतिनिधी)हवेली तालुका हा लोकसंख्येने जिल्ह्यात सर्वाधिक मोठा तालुका होता. हा तालुका हगणदरीमुक्त करणे हे आमच्यासमोर मोठे आव्हान होते; मात्र तालुक्यातील ग्रामस्थांनी चांगले सहकार्य केल्यामुळे ३0 नोव्हेंबरपर्यंत तालुका हगणदरीमुक्त होईल. - प्रदीप कंद, अध्यक्ष, जिल्हा परिषद ज्या कुटुंबांकडे शौैचालये नाहीत, त्यांचे वीज, पाणी, बँक लोन बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. दिवाळी असल्याने ही कारवाई सध्या केली नाही. मात्र दिवाळीनंतर ही कारवाई करण्यात येणार आहे. यावर्षी पावसाचे दिवस वाढल्याने आमची मोहीम थंडावली होती, मात्र आता वेगाने काम सुरू आहे. - राहुल साकोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग
हवेलीही हगणदरीमुक्तीच्या वाटेवर
By admin | Published: October 26, 2016 5:45 AM