पुणे : तीन वर्षांच्या कार्यकाळ पूर्ण झाला नसतानाच हवेली प्रांत अधिकारी सचिन बारवकर यांची शासनाने तडकाफडकी बदली केली. बारवकर यांची बदली सांगली जिल्हाधिकारी कार्यालय भूसंपादन अधिकारी म्हणून बदली केली. बारवकर यांच्या जागेवर अद्याप अन्य अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली नाही.
महसूल विभागात प्रामुख्याने क्रिम पोस्टिंगसाठी अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड चढाओढ होते. परंतु गेल्या काही वर्षांत असे पोस्टिंग मिळविण्यासाठी मुदतपूर्वच एकमेकांना खो देण्याचे प्रकार खूप वाढले आहेत. राजकारणी लोकांना हाताशी धरून अधिकारी प्रचंड रकमांची उलाढाल करून अशा क्रिम पोस्टिंगसाठी प्रयत्न करतात. हवेली प्रांत अधिकारी बारवकर यांना या पदावर दोन वर्षांचाच कार्यकाळ झाला असून, बदलीसाठी पात्र नसताना शासनाने जुनी चौकशी उकरून काढत ते कारण दाखवत बदली केली आहे. बारवकर यांच्या बदलीमुळे मात्र महसूल विभागातील मुदतपूर्वच अधिकाऱ्यांना खो देण्याच्या प्रकाराची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. आता हवेली प्रांत अधिकारीपदी कोण येणार? यांची लोकांना उत्सुकता आहे.