शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

संकेतस्थळ बंद असल्याने ‘आधार’साठी अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 3:31 AM

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहर आणि जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व खासगी बँका, टपाल कार्यालये, नागरी सुविधा केंद्र आणि महापालिकांची क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आधार केंद्र सुरु करण्यात आली आहे. यामुळे सध्या जिल्ह्यात सरासरी ३५० हून अधिक आधार नोंदणी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

पुणे - जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहर आणि जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व खासगी बँका, टपाल कार्यालये, नागरी सुविधा केंद्र आणि महापालिकांची क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आधार केंद्र सुरु करण्यात आली आहे. यामुळे सध्या जिल्ह्यात सरासरी ३५० हून अधिक आधार नोंदणी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु गेल्या तीन दिवसांपासून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (यूआयडीएआय) चे संकेतस्थळ बंद पडले असून, यामुळे केंद्रांवर नोंदणी व दुरुस्तीचे काम ठप्प आहे. यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढला आहेत.शासनाने सुरुवातील खासगी कंपन्या मार्फत आधार नोंदणी सुरु केली होती. परंतु या खासगी व्यक्तींकडून आधार नोेंदणीसाठी नागरिकांकडून बेकायदेशीर पणे पैसे घेतले जात असल्याच्या अनेक तक्रारी आला.त्यानंतर शासनाने खासगी कंपन्यांकडून हे काम काढून घेतले व शासनाच्याच महाआॅनलाइन या कंपनीकडे हे काम सोपविले. महाआॅनलाइनला आधारची ही मोठी यंत्रणा झेपली नाही. याबरोबरच राज्य शासनाने विविध अधिसूचना काढून पुन्हा रद्द करणे, महाआॅनलाइन आणि खासगी कंपन्यांमधील टक्केवारीचा वाद, तांत्रिक बाबी आणि किचकट प्रक्रिया अशा विविध कारणांमुळे जून २०१७ पासून शहर आणि जिल्ह््यातील आधार यंत्रणा ठप्प झाली होती. या काळात जिल्हाभरात मिळून एकूण केवळ चाळीस आधार केंद्रे सुरू होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने महाआॅनलाइन, यूआयडीएआय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून आधार केंद्रे वाढविण्याचा प्रयत्न केला.आधार यंत्रे दुरुस्तीचे अधिकार स्थानिक पातळीवर मिळावेत आणि खासगी आधार यंत्रचालकांनी शासकीय इमारतींमध्ये आधारची कामे करण्याला परवानगी द्याावी, अशा जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांना डिसेंबरमध्ये मान्यता देण्यात आल्यानंतर शहर आणि जिल्ह््यातील आधार केंद्रे पूर्ववत होण्यास सुरुवात झाली.देशातील प्रत्येक जिल्ह्यातील बँकांनी त्यांच्या दहा शाखांमागे एक आधार नोंदणी केंद्र सुरू करावे, असा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्याबाबतचा अध्यादेशही केंद्राकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याकरिता देशातील प्रत्येक जिल्ह्यासाठी केंद्र शासनाकडून १२९ आधार यंत्रे पुरविण्यात आली आहेत, अशी माहिती आधार समन्वयक अधिकारी मनोज जाधव यांनी दिली.माहिती अपलोड होण्यास अडचणीदरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून यूआयडीएआयचे संकेतस्थळ बंद असल्याचे चित्र समोर आले आहे. आधार केंद्रांवर नोंदणी आणि दुरुस्तीची संकलित झालेली माहिती संकेतस्थळावर अपलोड होण्यास अडचणी येत असून आधारची कामे झाल्याची स्थिती समजत नाही. त्यामुळे नोंदणी किंवा आधारमधील दुरुस्तीचे काम झाले आहे किंवा कसे,याबाबत माहिती मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.जिल्ह्यात सध्या सरासरी ३५० हून अधिक आधार नोंदणी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्यापैकी पुणे जिल्हा ग्रामीण भागात सर्व तालुक्यांमध्ये सुमारे १२० आधार नोंदणी केंद्रे सुरु आहेत.पुणे शहर :बँका - ६१क्षेत्रिय कार्यालय - २०नागरी सुविधा केंद्रे - ४५टपाल कार्यालय - ४७पिंपरी-चिंचवड शहर :बँका - १४क्षेत्रीय कार्यालय - ८नागरी सुविधा केंद्रे - १८ महाआॅनलाइन केंद्र - १२टपाल कार्यालय - १७

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डPuneपुणे