सोमवारी डिंगोरे ६, धोलवड ६, ओतूर शहर ८, उदापूर ३, आंबेगव्हाण, खामुंडी, पाचघर प्रत्येक गावात एक-एक असे २६ नवीन रुग्ण सापडले आहेत. ओतूर शहरातील बाधितांची संख्या ८९३ झाली आहे, ७५६ बरे झाले आहेत १०८ उपचार घेत आहेत २९ जणांचा मृत्यू झाला आहे. डिंगोरे येथील बाधितांची संख्या २०१ झाली आहे. १५८ बरे झाले आहेत ३६ उपचार घेत आहेत. ७ जणांचा मृत्यू झाला आहे. धोलवडचे बाधितांनी शतक पूर्ण केले आहे. ७५ बरे झाले आहेत. २० जणांवर उपचार सुरू केले आहेत. उदापूरची बाधितांची संख्या १६८ झाली आहे.१२१ बरे झाले आहेत. ४१ जण उपचार घेत आहेत. ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
पाचघरची संख्या ४९ असून ४१ बरे झाले आहेत. ५ जण उपचार घेत आहे, ३ जणांचा मृत्यू झाला आहे. खामुंडीचे ९५ पैकी ६९ बरे झाले आहेत, २० जण उपचार घेत आहेत. ६ जणांचा मृत्यू झाला आहे. आंंबेगव्हाणच्या २० पैकी १४ बरे झाले आहेत, ५ जण उपचार घेत आहेत, एकाचा मृत्यू झाला आहे.