शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
4
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
5
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
6
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
7
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
8
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
9
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
10
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
11
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
12
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
13
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
14
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
16
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
17
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
18
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
19
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
20
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा

गुटख्यामध्ये घातक रसायने, कारवाईची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2019 11:51 PM

अन्न व औषध प्रशासनाचा अहवाल : नोव्हेंबरमध्ये पोलिसांनी टाकला होता छापा

लोणी काळभोर : येथील पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन महिन्यांपूर्वी पकडलेल्या गुटख्या संदर्भातील अन्न व औषध प्रशासनाचा अहवाल पोलिसांना मिळाला असून सदर गुटख्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटसह कर्करोग होऊ शकतील, अशी घातक रसायने असून संबंधितावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर २०१८ रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाने २९ लाख ६६ हजार रुपये किमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गोवा कंपनीचा गुटखा जप्त केला होता. याप्रकरणी गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला १२ लाख रुपये किमतीचा टेम्पो ताब्यात घेतला होता व त्यावरील परप्रांतीय चालकास अटक करण्यात आली होती. ही कारवाई कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका येथे ६ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी साडेआठला करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवाण, हवालदार समीर चमनशेख, सचिन मोरे, परशराम सांगळे, सागर कडू या पोलीस पथकाने केली होती. या वेळी शेंदरी रंगाच्या आयशर टेम्पो (टीएस १२, यूए ५५७२) ची तपासणी केली. त्याच्या मागील बाजूस २९ लाख ६६ हजार रुपये किमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गोवा कंपनीचा गुटखा मिळून आला. टेम्पोचालक शमीम अब्दुल वाहीद अहमद (वय ३२, रा. कोकटपल्ली हबीबनगर, हैदराबाद) यास सदर टेम्पो व मालासह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याकरीता अन्न व औषध प्रशासन पुणे यांचेकडे सुपूर्त करण्यात आला असून एकूण कारवाईमध्ये २९ लाख ६६ हजार रुपये किमतीचा गुटखा व १२ लाख किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण ४१ लाख ६६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता.अन्न व औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी गणपत पांडुरंग कोकणे (वय ५१, रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) यांनी या गुटख्याची तपासणी करून पोलिसांना अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार सदरचा माल हा गुटखा असून त्यात कॅल्शियम कार्बोनेटसारखे बंदी घातलेले घटक आहेत. संबंधितांनी अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ व २०११ चे उल्लंघन केले आहे. या गुटख्यामुळे कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे संबंधितांवर योग्य ती कडक कारवाई करावी, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणे