दर वर्षी संदल व गलफ (चादर) अर्पण करून उत्साहात उरुसाला सुरुवात होत असते. मोठी यात्रा या ठिकाणी भरत असते. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने उरूस साधेपणाने साजरा केला जात आहे. परंपरेनुसार संदल तयार करण्याचा मान हा हमीदभाई आत्तार यांचे घराण्याकडे आहे. गलफ (चादर) अर्पण करण्याचा मान हा इंदापूर पोलीस स्टेशन यांचा आहे. पहिल्या दिवशी हा कार्यक्रम झाल्यानंतर उरूसास सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी उरुस असतो व तिसऱ्या दिवशी बाबांच्या झेंड्याची ग्राम प्रदक्षिणा होऊन उरुसाची समाप्ती होते.
यंदा हे उरूस २२, २३, २४ डिसेंबर रोजी होत आहे. उरूस कमिटीचे अध्यक्ष आझाद पठाण, उपाध्यक्ष महादेव चव्हाण, दर्गाहचे पुजारी मुनीरभाई मुजावर, जाफरभाई मुजावर, माजी नगरसेवक शेरखान पठाण, फकिर पठाण यांनी फिजिकल सोशल डिस्टसिंग ठेवून व सॅनिटायझरचा वापर करून उरूस साधेपणाने करावा असे आवाहन केले आहे.
तहसिलदार यांच्याकडून मास्क व सॅनिटायझरचे वाटप
इंदापूर शहरात मागील साडे चारशे वर्षांपासून सुरू असलेल्या हजरत चांदशवली बाबांच्या उरुसाला मोठी परंपरा आहे. यंदा ही परंपरा खंडित होवू नये यासाठी साधेपणाने उरूस साजरा करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्याला उरूस कमिटीने चांगला प्रतिसाद दिला असून तहसीलदार सोनाली मेटकरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हजरत चांदशवली गडावर जावून नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.
इंदापूर पोलीस स्टेशन ते हजरत चांदशाह वली बाबा गड पर्यंत डोक्यावर गलफ व चादर घेवून जात असताना पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर व अधिकारी
२४ इंदापूर उरुस