पुणे : प्रत्येक पालकांची आपला मुलगा मोठ्या शाळेतून शिकावा अशी असते. यामुळे जिल्हा परिषदांच्या शाळेतील मुलांची संख्या कमी होत आहे. मात्र, जालना येथील एका मुलाने सर्वसामान्यांचा हा समज दुर केला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून शिक्षण घेत त्याने लष्कराची कुठलीही पार्श्वभूमी नसताना एनडीएत प्रवेश मिळवला. तीन वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून तो नौदलात अधिकारी होणार आहे. राहूल लाड असे या धैय्यवेड्या तरूणाचे नाव आहे. राहुल हा जालण्या जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील महाकाळा या गावचा आहे. या गावातच जिल्हा परिषद शाळेत त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. यानंतर औरंगाबाद येथील सर्व्हिसेस प्रीपेटरी इन्स्टिट्यूट (एसपीआय) या विद्यालयात त्यांने प्रवेश घेतला. येथून ११ वी आणि १२ वी करतांना लष्कराचे आकर्षण असल्याने त्याने एनसीसीत प्रवेश घेतला. यामुळे लष्करी जीवन त्यांला जवळून अनुभता आहे. याच काळात त्याचे लष्करात जाण्याचे ठरवले आणि एनडीएमध्ये जाण्याची त्याची धडपड सुरू झाली. एसपीआय मध्येच त्यांने एनडीएच्या परिक्षेची तयारी केली. तयारी करतांना विद्यालयातील शिक्षकांचे त्याला मार्गदर्शन लाभले. यामुळेच एनडीएच्या परीक्षेत पास होता आले असे राहूलने सांगितले. राहुल हा सामान्य घरातील मुलगा आहे. त्याचे वडील एका खाजगी साखर कारण्यात क्लार्क म्हणून कार्यरत होते. ते सेवानिवृत्त झाल्याने घरची जबाबदारी त्याचा मोठा भाऊ बाळासाहेब याच्यावर आली. तो शिक्षक आहे. आपला भाऊ अधिकारी व्हावा या उद्देशाने त्याने राहुलच्या स्वप्नांना उभारी दिली. भावाच्या परिश्रमाचे चीज करत त्याने एनडीएतील खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. राहुलच्या घरात लष्कराची कुठलीही पार्श्वभूमी नाही. त्याने स्वत: लष्करात जाण्याचा निर्णय घेतला. वडीलांना याबबत त्याने बोलून दाखलवले. मात्र, वडिलांना याची काही माहिती नव्हती. त्यांची निवड झाल्यानंत त्याने वडीलांना याची माहिती दिली. मात्र, मुलाच्या यश पाहून त्यांचे उर भरून आले आहे. .......... एनसीसीने दाखवले एनडीएचे स्वप्न शाळेत असतांना भविष्यात आपण काय व्हावे याबाबत राहुलने कधी विचार नव्हता केला. अभ्यासात हुशार असल्याने त्याने औरगाबाद येथे महाविद्यालयात प्रवेश घेतला. या सोबतच त्याने एनसीसीतही प्रवेश घेतला. एनसीसीच्या एका कॅप्ममध्ये लष्करी अधीकारी आले. त्यांनी तेथे एनडीए प्रवेशाबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनापासून प्रभावीत होत राहुलने एनडीएची तयारी केली. पायाभूत माहिती मिळवून त्याने अभ्यासाला सुरूवात केली. सुरवातीला त्याला दोनचा अपयश आले. मात्र, तिस-या प्रयत्नात अवघड परीक्षा त्याने उत्तीर्ण केली. ...........ग्रामीण भागातील मुलांना न्यूनगंड असतो. मात्र, ते हुशार असतात. शिक्षण घेत असतांना स्वत:तील कौशल्य ओळखलते तर हवे ते साध्य करता येते. मीही तेच केले. मी जर एनडीए मध्ये लष्करी प्रशिक्षण पूर्ण करू शकतो तर ते ग्रामीण भागातील कोणताही विद्यार्थी पूूर्ण करू शकतो. शहरी मुलांनी दहा तास अभ्यास केला तर मला १२ तास करावा लागायचा. ग्रामीण भागातील मुलांकडे चिकाटी उपजतच असते फक्त जिद्द बाळगायला हवी. - राहूूल लाड, एनडीए पास आउट कॅडेट