शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

सासूच्या पाया पडण्याच्या बहाण्याने खाली वाकला आणि..! पोलीस ठाण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 12:17 PM

सुदैवाने दक्ष पोलिस उपनिरीक्षकाने जावयाला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला

पुणे: कौटुंबिक हिंसाचाराची फिर्याद देण्यासाठी मुलीबरोबर हडपसरपोलिस ठाण्यात आलेल्या सासूची माफी मागण्याचा बहाणा करून पाया पडण्यासाठी खाली वाकून जावयाने सासूवरच चाकूहल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार हडपसरपोलिस ठाण्यात घडला. सुदैवाने दक्ष पोलिस उपनिरीक्षकाने जावयाला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. या सर्व प्रकारात सासूच्या गालाला जखम झाली आहे. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

या प्रकरणी मंगेश महादा तारे (वय २९, रा. वडगावशेरी) या जावयाला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले. या हल्ल्यात पुष्पा दामोदर पालवे (वय ४६, रा. महादेव नगर, मांजरी) या जखमी झाल्या. याबाबत आरोपीचे सासरे दामोदर पालवे यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार शनिवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडला.अधिक माहितीनुसार, मंगेश तारे आणि पूजा तारे हे दाम्पत्य वडगाव शेरी येथे राहते. मंगेश हा वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्याने पूजा या आपल्या आईकडे आल्या होत्या. त्यानंतर त्या तक्रार देण्यासाठी हडपसर पोलिस ठाण्यात आले. तेथे मंगेशही आला होता. त्याने आमचा काही वाद नाही. माझे चुकले असेल तर माफी मागतो, असे म्हणत सासूच्या पाया पडण्याचा बहाणा केला. त्याचवेळी तो खाली वाकला व जर्किनच्या खिशातून भाजी कापण्याचा चाकू काढून सासूवर वार करण्याचा प्रयत्न केला. तो त्यांच्या गालाला लागला. काही समजायच्या आत हे घडले. त्यानंतर तो पुन्हा त्यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न करीत असतानाच तेथे उपस्थित असलेला पोलिस उपनिरीक्षक संतोष गोरे यांनी मंगेशला रोखले व त्याच्या हातातील चाकू काढून घेतला. पोलिस उपनिरीक्षक संतोष गोरे यांनी दाखवलेल्या दक्षतेमुळे पुढील अनर्थ टळला.

कौटुंबिक वाद मिटल्याचा बहाणा करत जावयाने सासूवर लपवून आणलेल्या चाकूने काही कळण्याच्या आत वार केले. आमच्या पोलिस उपनिरीक्षकाने त्याचा हल्ला करण्याचा प्रयत्न हाणून पाडत त्याला ताब्यात घेतले.- अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हडपसर पोलिस ठाणे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसHadapsarहडपसरCrime Newsगुन्हेगारीArrestअटक