पुणे : जाे संसार करत नाही, त्याला घरी गेल्यावर काही काम नसते अाम्ही संसारी अाहाेत गॅसचे दर वाढले , पेट्राेलचे दर वाढले, महिन्याचे पैसे वीस दिवसात संपले हे सर्व अाम्हाला एेकून ध्यावे लागले. त्यामुळे त्यांना महागाई काय समजणार अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यावर नाव न घेता टीका केली.
इंदापूर येथील डाळज क्रमांक दाेन ते कुंभारगाव या रस्त्याचे भूमिपूजन व ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दत्तात्रय भरणे होते. पवार पुढे म्हणाले, मोदींचे तसे नाही. ते एकटा जीव सदाशिव आहेत. त्यांना घरी कोणी सांगायलाच नाही. त्यामुळे घरी गेले की निवांत झोपायचे. अशा गोष्टींची चर्चा होत नसल्यामुळे याची झळ बसायचा प्रश्नच नाही. आमची अवस्था मात्र पांडू हवालदार, सोंगाड्यासारखी झाली अाहे. आमच्या आघाडी सरकारने वीस वर्षाच्या काळात अनेक कामे केली. तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिले. मात्र आताचे हे सरकार फसवे आहे. केवळ घोषणांचा पाऊस मात्र त्याची अंमलबजावणी नाही असा एककलमी कार्यक्रम भाजपाचा सुरू आहे. एव्हढेच नव्हे आमच्या सरकारच्या वीस वर्षाच्या काळात अडीच लाख कोटी कर्ज होते. मात्र या भाजप सरकारने चार वर्षाच्या काळात पाच लाख कोटी कर्जाचा ढोंगर उभा करून ठेवला आहे असेही ते अापल्या भाषणात म्हणाले.