पुणे : एम्प्लॉयमेंट व्हिसा असतानाही पैसे वाचविण्यासाठी त्याने बनावट टुरिस्ट व्हिसा घेऊन दुबईला जाण्याचा प्रयत्न केला़. परंतु, तपासणी करताना विमानतळावरील अधिकाऱ्यांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही़. त्यामुळे विमानयात्रा करण्याऐवजी त्याला जेलयात्रा करण्याची पाळी आली आहे़. शेख महंमद युसुफ (वय ४६, रा़. एनआयबीएम, येवलेवाडी) असे त्याचे नाव आहे़. याप्रकरणी लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इमिग्रेशन अधिकारी हेमांशु शुक्ला यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत विमानतळ पोलिसांनी सांगितले की, शेख महंमद युसुफ यांना कामासाठी दुबईला जायचे होते़. त्यासाठी त्यांच्याकडे एम्प्लॉयमेंट व्हिसाही होता़. दुबईला जाण्यासाठी व तेथे एम्प्लॉयमेंट व्हिसावर गेल्यावर पीओईला जादा पैसे लागतात़. त्याऐवजी टुरिस्ट व्हिसावर गेल्यास कमी पैसे लागतात़, याची माहिती मिळाल्याने त्यांनी दुसरा टुरिस्टचा बनावट व्हिसा तयार करुन घेतला़. त्या बनावट व्हिसावरुन ते शनिवारी एअर इंडियाच्या विमानाने दुबईला जाणार होते़. त्यासाठी ते शनिवारी दुपारी लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इमिग्रेशनला गेले़. त्यांची कागदपत्रे तपासत असताना तेथील अधिकाऱ्यांना त्यांच्याकडील माहिती शेख यांच्याकडे एम्प्लॉयमेंट व्हिसा असल्याची नोंद दिसत होती़. पण, ते प्रत्यक्षात टुरिस्ट व्हिसा दाखवत होते़. त्यामुळे इमिग्रेशन अधिकाऱ्यांना संशय आला़ त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी आपल्याकडे एम्प्लॉयमेंट व्हिसा असल्याची कबुली दिल़ी़. त्यानंतर त्यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद देऊन शेख यांना पोलिसांच्या ताब्यात दिले़. व्हिसा असताना काही पैसे वाचविण्याच्या प्रयत्न त्यांनी बनावट टुरिस्ट व्हिसा काढला़. एकाच क्रमांकाचे दोन व्हिसा आढळल्याने नोकरीसाठी विमानयात्रा करणाऱ्यांना आता जेलयात्रा करावी लागली आहे.
पैसे वाचविण्याच्या प्रयत्नात विमानयात्रेऐवजी झाली जेलयात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 4:25 PM
एम्प्लॉयमेंट व्हिसा असतानाही पैसे वाचविण्यासाठी त्याने बनावट टुरिस्ट व्हिसा घेऊन दुबईला जाण्याचा प्रयत्न केला़...
ठळक मुद्देबनावट व्हिसावर दुबईला जाणाऱ्यास अटक