लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भूषण मराठे या विद्यार्थ्याने सन २०१६ पासून तस्करीच्या धंद्याला सुरुवात केली. पुण्यात तो शिक्षणानिमित्त आला असताना झालेल्या ओळखीतून त्याने २०१७ आणि २०१८ मध्ये राहुल पवार, तौफिक शेख, आणि राम जाधव यांना ४ पिस्तूल विक्री केल्याचे सांगितले.
या गुन्ह्यात मराठेने विक्री केलेली पवार याच्याकडून २ पिस्तूल आणि ४ जिवंत काडतुसे, शेख याच्याकडून १ पिस्तूल आणि ३ जिवंत काडतुसे तर जाधव याच्याकडून १ पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्याने आणखी कोणाला पिस्तुले विक्री केली आहे का याचा सध्या तपास सुरू आहे. याप्रकरणात आणखी एक आरोपी निष्पन्न झाला असून त्याचा तपास सुरू आहे. पिस्तुले पुरविणारी परराज्य टोळी आहे का, याचा तपासही सुरू वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंजाड, श्रीकांत चव्हाण, अंमलदार संपत अवचरे, प्रदिप शितोळे, विनोद साळुंके, सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, विजय गुरव, राहुल उत्तरकर, भूषण शेलार, रूपाली कर्णवार, आशा कोळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.