सांगवी : १९७८ साली दोन्ही कॉंग्रेसचे सरकार चांगले चालले होते. यशवंतराव चव्हाणांचा विरोध आसताना देखील शरद पवारांनी बंडखोरी व डावपेच आखून सरकार पाडलं आणि शरद पवार मुख्यमंत्री झाले. अनेक दिग्गज नेते त्यांच्या मंत्रिमंडळात आले. यशवंतराव चव्हाणांनी शरद पवारांना मानसपुत्र मानले होते, त्यांना ही भूमिका आवडली नव्हती. लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्यावर आरोप केले. मग मी कांय गद्दारी केली साठीच्यावर माझं वय झालं तरी मी सगळं ऐकत आलो. वय झाल्यावर तरुणांच्या हातात कारभार दिला जातो, पण तसे झाले नाही. शरद पवारांनी राजकीय खेळी केल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निशाणा साधला. यामुळे पवार कुटुंबात आरोप प्रत्यारोप चांगलेच वाढलेले दिसून येत आहेत.
सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद भावजयीमध्ये बारामती लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. पवार कुटुंबियांमध्ये होत असलेल्या या लढतीसाठी शरद पवार गट व अजित पवार गटांकडून प्रचार, बैठका, सभांना आता बारामतीमध्ये वेग आला आहे.
सांगवी ( ता.बारामती) येथे रविवार ( दि.२८) रोजी बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभेत अजित पवार बोलत होते. पुढे अजित पवार म्हणाले सरकार पडल्या नंतर रामटेक बंगल्यावर मीटिंग सुरू होती,तिथं यशवंतराव चव्हाणांचा फोन आला होता, परंतु फोन घेतला गेला नाही. १९७८ मध्ये 'पुरोगामी लोकशाही दल' म्हणजेच 'पुलोद'चं सरकार स्थापन होऊन शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. दीड वर्षांहून अधिक काळ हे सरकार चाललं.
दरम्यानच्या काळात देशातली समीकरणंही बदलली. जनता पक्षात फूट पडली. शेवटी इंदिरा गांधीनी शिफारस केल्यावर राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू झाली आणि पवारांचं पहिलं सरकार बरखास्त झालं.लोक माझे सांगाती या पुस्तकात सर्व लिहिलेले आहॆ.असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.