लोकमत न्यूज नेटवर्क
वाकी बुद्रुक : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पोहण्यासाठी जात असल्याचे सांगत काही वेळात येतो, असे सांगत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्याला होडीची धडक बसल्याने त्याच्या मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. ३) घडली.
कुणाल माणिक पडवळ (वय १९, रा बोरदरा, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. कुणाल हा वाकी बुद्रुक येथे त्याच्या मामाकडे आईबरोबर सर्वांना भेटायला आला होता. आईला मामाच्या घरी सोडून जेवण करून तो वाकी बुद्रुक येथील भामा नदीच्या स्मशानभूमीच्या जवळच्या पात्रात पोहायला गेला होता.
आईला जाताना पाच मिनिटांत पोहून आलो, असं म्हणाला. मात्र, पोहत असताना अचानक नदीपात्रात असलेल्या होडीची धडक त्याच्या डोक्याला लागली. यामुळे तो पाण्यातच बेशुद्ध पडला. डोक्याला जोराचा मार लागल्याने कुणालचा मृत्यू झाला.
ही घटना कानी पडताच आई अ्न कुणालचे कुटुंबीय सगळ्यांना अचानक धक्का बसला. त्याला उपचारासाठी येथील दवाखान्यात नेण्यात आले होते. पण डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. पोस्टमन कांतीलाल गारगोटे व महेश गारगोटे यांचा कुणाल भाचा होता.
फोटो :-
कुणाल माणिक पडवळ.