पिंपरी: खासगी कॉल सेंटरमध्ये काम करत असताना महिलेशी ओळख केली. त्यानंतर महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करण्यासाठी जॉब साठी नर्सिंग कोर्स करिता क्रेडिट व डेबिट कार्ड वापरून खरेदी करून ११ लाख रुपयांची फसवणूक केली. पुणे येथे २० नोव्हेंबर २०१७ ते २३ डिसेंबर २०२० या कालावधीत हा प्रकार घडला आहे.
पीडित ३१ वर्षीय महिलेने या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दिली आहे. रोनित डी कपूर उर्फ संदीप दादाराव वायभिसे (वय ३४, रा. वडगाव शेरी, पुणे), असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि वायभिसे हे दोघेही कॉल सेंटरच्या एका खासगी बीपीओ कंपनीत नोकरीला असताना त्यांची ओळख झाली. बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी, सिंगापूर येथे जॉब करिता, नर्सिंग कोर्स करिता आरोपीने फिर्यादीचे क्रेडिट व डेबिट कार्ड वापरले. तसेच अनेक गोष्टींची खरेदी केली. लग्नाचे आमिष देऊन फिर्यादीची ११ लाख रुपयांची फसवणूक केली. महिलेला सर्व घटना कळल्यावर महिलेने पैसे मागितले असता पैसे परत देणार नाही, अशी धमकी देऊन आरोपीने महिलेवर लैंगिक अत्याचार केले.