पुणे : पुण्याच्या कोथरूड भागातील उद्योगपतीचा बिहारच्या पाटण्यात खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लक्ष्मण साधू शिंदे ( वय ५५) असे हत्या झालेल्या उद्योगपतीच नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या कामासाठी मेल करत पाटण्यात बोलावून घेत या उद्योगपतीची हत्या करण्यात आली आहे. कंपनीचे काही टूल्स आणि मशीनरी स्वस्त भावात विकत देतो असा आरोपींकडून उद्योगपतीला मेल आला होता. स्वस्तात मशिनरी मिळेल यासाठी उद्योगपती बिहारला गेले होते. काल पाटण्यात त्यांचा मृतदेह सापडला. याबाबत पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबाकडून देण्यात आली होती.