शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
2
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
3
Share Market Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात जोरदार खरेदी; Sensex-Nifty मध्ये तुफान तेजी
4
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
5
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
6
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
7
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
8
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियात पाकिस्तानने एक सामना जिंकला तर...", अक्रमने आपल्याच संघाची लाज काढली
10
मल्लिकार्जुन खरगेंनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले,मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण; नेमकं प्रकरण काय?
11
ऐन सणासुदीच्या-निवडणुकीच्या काळात मावळ हादरले! पवन मावळातील ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या
12
Maharashtra Election 2024: दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे; दुभंगलेल्या शिवसेनेचे अस्तित्व पणाला
13
Washington Sundar वर का आली सहकाऱ्यांची जर्सी घालून खेळण्याची वेळ? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
"माहिमची जागा भाजपाकडे असती तर एका मिनिटात निर्णय घेतला असता, आता..." बावनकुळेंचं मोठं विधान
15
ऐकावं ते नवलंच! हेमंत सोरेन यांचे वय 5 वर्षात 7 वर्षांनी वाढले, भाजपने साधला निशणा...
16
भाजपची 'चाणक्य नीती'? १७ इच्छुकांचे तिकीट पक्के; शिंदे गट-अजित पवार गटातून संधी!
17
ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश म्हात्रे यांची शिंदे सेनेतून हकालपट्टी! पक्ष संघटनेच्या विरोधात काम करीत असल्याने कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमदार निवडून आणणार,सन्मानाने पक्षात प्रवेश करणार'; उमेश पाटलांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
19
IPL Retention 2025 : KL राहुलने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड? धोनी ठरला 'व्हॅल्यू फॉर मनी'!
20
डबल मर्डर केसमध्ये एकाला पकडलं; ७० हजारांसाठी अल्पवयीन मुलाने रचला भयंकर कट

भीक मागण्यासाठी चक्क आपल्याच मुलीला विकले; पुण्यातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 11:28 AM

पोलिसांनी मुलीच्या आईवडिलांसह १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे़.

पुणे : भीक मागण्यासाठी आपल्याच चार वर्षाच्या मुलीला तिच्या आईवडिलांनी २ हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिचा ताबा असलेल्या दोघा पती पत्नीला अटक केली आहे.याबाबत अ‍ॅड. शुभम शंकर लोखंडे (वय २६, रा. वैदुवाडी, हडपसर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मुलीच्या आईवडिलांसह १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे़.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वकिल असून त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने त्यांना कळविले की, दोघा आई वडिलांनी त्यांची ४ वर्षाची मुलगी तिघा जणांना २ हजार रुपयांना विकली आहे. समाजातील १० पंचांची त्यासाठी सहमती घेतली आहे. दोघांनी या मुलीला येरवडा येऊन २ हजार रुपयांना भीक मागण्याच्या उद्देशाने बारामती येथील सुपे येथे घेऊन गेले असून तिला गुलाम बनवून जबरदस्तीने भीक मागायला लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, आपण या मुलीला दत्तक घेतल्याचा दावा या मुलीचा ताबा असलेल्या दाम्पत्याने केला आहे़ पोलीस उपनिरीक्षक नांगरे तपास करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे