या प्रकरणी पती किसन भीमाजी भारमळ (वय ५५) यांच्याविरुद्ध पत्नीने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे. नंदा किसन भारमळ (वय ४३) व पती किसन भारमळ हे वाडा रोड येथील गोळी कारखाना येथे शिव कदम बीबी यांच्या चाळीत राहण्यास होते. पत्नी नंदा भारमळ या मोलमजुरीचे काम करतात. पती किसन भारमळ हा संगम गार्डन सोसायटीचे सिक्युरिटी काम करत होता. सोमवारी (दि.८) दुपारी २ च्या सुमारास पती किसन भारमळ घरी आला होता. दरम्यान नंदा यांच्या नातेवाईक दीपाली भोईटे घरी आल्या होत्या. घरात आलेली मुलगी कोण आहे, असे पतीने विचारले असता पत्नीने पतीला येथून निघून जाण्यास सांगितले. त्याचा राग मनात धरून पती किसन यांने नंदा यांच्यावर चाकूने वार करत त्यांना गंभीर जखमी केला. या नंतर तो फरार झाला. या घटनेबाबत पोलिसांनी आरोपी किसन भारमळ याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपीला दोन दिवस पोलिस कोठडी दिली असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गादर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल लाड करत आहे.
चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर चाकूने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:13 AM