या वर्षी कोविड महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे ध्वजारोहण सोहळाही पार पाडता आला नाही. मात्र १ मे ला विद्यालयाने ५ वी ते ९वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल दिला आहे. याबाबत प्राचार्य अनिल शिंदे यांनी सांगितले की, आमचे विद्यालय २३ नोव्हेंबरपासून सुरू होते. त्याअगोदर ऑनलाइन तास सर्वच वर्गांचे होत होते. या काळात आम्ही चाचणी परीक्षा,१० वी व १२ वीच्या सराव परीक्षा पार पाडल्या. या परीक्षेचे गुण लक्षात घेऊन आम्ही वेळेत निकाल जाहीर केला. उन्हाळ्याच्या सुट्टीत काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या, स्थलांतर व इतरही कारणाने दुसऱ्या शाळेत मुले जातात. त्या वेळी दाखला व गुणपत्रक गरजेचे असते. पालकांची हेळसांड होऊ नये म्हणून आम्ही नेहमीप्रमाणे महाराष्ट्र दिनी १ मे ला निकाल जाहीर केला. विद्यालयात गर्दी होऊ नये म्हणून प्रत्येक वर्गशिक्षकाने वर्गांच्या ग्रुपवर हा निकाल पाठविला आहे. दरम्यान १ मे ते १३ जूनअखेर विद्यालयास उन्हाळ्याची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
०२ टाकळी हाजी गुणपत्रक
तन्वी भंडारे या विद्यार्थिनीच्या घरी जाऊन निकाल देताना प्राचार्य अनिल शिंदे व पर्यवेक्षक साहेबराव आंधळे.