शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

अतिवापरामुळे हेडफोन सिंड्रोमच्या प्रमाणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 1:55 AM

तरुणांकडून मोठ्या प्रमाणावर वापर : अतिरेकी वापराने बहिरेपणाचा धोका

युगंधर ताजणे 

पुणे : कुणी कुणाशी काही बोलायचे नाही. शाळा-महाविद्यालयातून सुटका झाल्यावर, कामावरून घरी परतताना, इतकेच नव्हे, तर घरात सतत कानाला हेडफोन लावून गाणी ऐकण्याचे, कुणाबरोबर बोलणे सुरूच असते. दिवसभरात आठ तासांपेक्षा अधिक काळ हेडफोनचा वापर करून आता तरुणांमध्ये बहिरेपणा वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून तर कानाला हेडफोन लावून बोलण्याचे जे फॅड तरुणांमध्ये पसरले आहे त्याचे अनुकरण शाळेतील लहान मुले करताना दिसून येत आहे. या सगळ्याचा गंभीर परिणाम त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होत असून पालकांनी त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

अन्न, वस्त्र, निवारा याबरोबर मोबाईल हीदेखील काळाची गरज होऊन बसली असताना त्याच्या जोडीने येणाऱ्या विविध अत्याधुनिक सोयी-सुविधा, त्याचे फायदे-तोटे याकडे सोयीने दुर्लक्ष करण्याचे प्रमाणदेखील वाढू लागले आहे. विशेषत: सातत्याने कानाला हेडफोन लावून बोलण्याच्या सवयीचे गंभीर पडसाद आता तरुणांच्या आरोग्यावर उमटू लागले आहेत. दिवसभर काम करताना, कामावरून घरी परतताना, प्रवासात असताना, कुठला उत्सव साजरा करताना, समारंभात सहभागी होताना, इतकेच नव्हे तर जेवतानादेखील अनेक जण हेडफोन काढणे टाळतात. दिवसातून सरासरी आठ तासांंपेक्षा अधिक काळ कानात अडकविलेल्या या हेडफोनमुळे बहिरेपणाचा धोका वाढला आहे. याविषयी अधिक माहिती देताना डॉ. सोमनाथ सलगर म्हणाले, की तरुणांपेक्षा शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये हेडफोन सिंड्रोमचे प्रमाण लक्षणीयरीत्या आढळून येते. हेडफोन वापरण्याच्या सवयीचे रुपांतर पुढे व्यसनात होते. याचे गंभीर परिणाम मुलांवर होतात. अपघाताच्या धोक्याबरोबरच एकाग्रता कमी होणे, एकलकोंडेपणात वाढ होणे, स्वभावात चिडचिडेपणा येणे यासारखे प्रकार सातत्याने हेडफोन वापरण्यामुळे होतात. प्रमाणापेक्षा वापर वाढल्यास त्याचा परिणाम मज्जासंस्थेवरदेखील होतो. मोठ्यांकडे बघून त्यांच्या अनुकरणातून हेडफोन सिंड्रोम शालेय विद्यार्थ्यांमध्ये दिसू लागला आहे. पुण्यात वाहतूक प्रशासनाच्यावतीने हेल्मेटसक्ती केली आहे. वाहन चालविताना हेडफोनद्वारे मोबाईलवर बोलणे नियमाचा भंग करणारे असून आता हेडफोनवर बोलणाºयांचे प्रमाण लक्षात घेऊन नवीन हेल्मेटमध्येदेखील हेडफोनसाठी व्यवस्था केली आहे.श्रवणक्षमतेवर परिणामकान, नाक, घसातज्ज्ञ डॉ. समीर जोशी यांनी सततच्या हेडफोनबाबत सांगितले, की सातत्याने ८ आठ तास ८० ते ९० डेसिबलपेक्षा जास्त क्षमतेचा आवाज कानावर पडत असल्यास त्याचे गंभीर परिणाम व्यक्तीच्या श्रवणक्षमतेवर दिसून येतात. त्याला बहिरेपण येते.सुरुवातीच्या काळात तात्पुरत्या स्वरुपात जाणवणारे बहिरेपण हे कायमस्वरुपी होऊन जाते.कानठळ्या बसविणारा आवाज सारखा कानावर आदळत असल्यास बहिरेपणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.वाहन चालविताना हेडफोन लावून बोलणाºयांवर यापूर्वी कारवाई करण्यात आली आहे. ज्या गोष्टीमुळे आपल्या जिवाला धोका आहे, याची माहिती असतानादेखील चुकीचे वर्तन केले जाते. विशेषत: तरुणांनी योग्य ती काळजी घ्यायला हवी. वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे. दुचाकी असो किंवा चारचाकी वाहनचालकांना काही करून मोबाईलवर बोलायचे असते. परिणामी आपला जीव धोक्यात घालून ते हेडफोनच्या मदतीने फोनवर बोलत राहतात. नवीन वर्षात अशा वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. - तेजस्वी सातपुते, वाहतूक पोलीस उपायुक्तमुळात कानात सतत हेडफोन लावण्याची गरज आहे का? हा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांमध्ये चिडचिडेपणा येतो आहे. चंचलता वाढत आहे. विशेषत: मोठ्यांचे अनुकरण करण्याची लहानांची सवय याचा तोटा त्यांना सहन करावा लागत आहे. पालकदेखील बिनधास्तपणे सातत्याने लहान मुले आणि विद्यार्थ्यांना हेडफोन वापरू देत आहेत. हेडफोनच्या रोजच्या वापराने एकाग्रतेवर प्रतिकूल परिणाम होतो. आज सगळ््यांना मोबाईलच्या माध्यमातूनच संवाद साधायचा आहे. कुणाशी बोलणे नको, घराबाहेर पडून मैदानावर खेळणे नको, यामुळे सर्वच वयांमध्ये कमालीचा एकलकोंडेपणा वाढीस लागला आहे. नैसर्गिक अभिव्यक्ती हरपून त्याची जागा यांत्रिकीकरणाने घेतल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.- डॉ. निशिकांत थोरात, मानसिक आरोग्यतज्ज्ञ

टॅग्स :Puneपुणे