पुणे : चांगल्या आरोग्यासाठी सुदृढ मनाबरोबरच मन सशक्त असणे गरजेचे असते. शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य हे उत्तम आरोग्याचे चार महत्त्वाचे निकष असून, त्यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांनी व्यक्त केले. डॉ. ह. वि. सरदेसाई लिखित पुस्तकांचे प्रकाशन गुरुवारी बालशिक्षण मंडळाच्या सभागृहात झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रायमर आॅफ हेल्थ, की टू गुड हेल्थ, लाइफस्टाइल, सम हेल्थ प्रॉब्लेम्स अँड देअर ट्रिटमेंटस आणि अनटील मेडिकल हेल्प अराइव्ह या मूळ मराठीतून इंग्रजीत भाषांतरीत करण्यात आलेल्या पाच पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. इंकिंग इनोव्हेशनचे आनंद लिमये आणि अनटील मेडिकल हेल्प अराइव्ह या पुस्तकाच्या सहलेखिका सरिता भावे होत्या. डॉ. सरदेसाई म्हणाले, प्रकृती इतकी दुसरी कोणतीही गोष्ट जीवनात महत्त्वाची नसून, त्याची योग्यप्रकारे काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. पुस्तकाचे भाषांतर केलेल्या प्रद्युम्न जहागिरदार, अमृता बेंद्रे आणि सुप्रिया साधले यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)