या मोहिमेद्वारे मातामृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याचा उद्देश आहे. शोधमोहिमेत आढळून आलेल्या कुपोषित बालकांवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेने दिल्या आहे. वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत, येथील ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांची तपासणी व सॅम व मॅम बालकांची धडक शोध मोहिमेअंतर्गत, बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
दरम्यान, बीट वाल्हे अंतर्गत ३० बालकांची तपासणी करून, औषधोपचार करण्यात आल्याची माहिती, वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. तेजस्विनी पवार, आरोग्य सेविका धनश्री राऊत यांनी सांगितले. दरम्यान, वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत परिसरातील गरोदर महिला, व स्तनदा माता, किशोरवयीन मुली यांची तपासणी मोहीम सुरू असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे पर्यवेक्षक राजेंद्र दळवी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन वाल्हे बीट पर्यवेक्षिका अनिता भुजबळ यांनी केले.
याप्रसंगी कल्पना राऊत, सरोजिनी कारंडे, छाया भुजबळ, सुनंदा यादव, कोमल पवार, सोनाली चव्हाण, सारिका भोसले, हेमलता जाधव, कल्पना भोसले, वैशाली शिंदे, आदी अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. तसेच बीट मधील सर्वच अंगणवाडी सेविका यांनी सहकार्य केले.