गावात आयोजित करण्यात आलेल्या शासनाच्या उपक्रमाची आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, सरपंच धनश्री पवळे व उपसरपंच यशवंत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी माजी सरपंच गणेश पवळे, योगेश आरगडे, पवनराजे जाचक, मोहन पवळे, ग्रामपंचायत सदस्य संदीप टेमगिरे, दत्तात्रय पोटवडे, अनिल आरगडे, माणिक खैरे, रोहिदास पवळे, गणेश पवळे, स्मिता वानखेडे आदींसह अन्य ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, आशावर्कर, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्वेक्षणसाठी गावात ३५ पथकांची नेमणूक करण्यात आली होती. गावातील नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. दरम्यान गावात संसर्ग प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्यात आली असून, नागरिकांनी तोंडाला मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे तसेच वेळोवेळी हात धुणे अशा प्रकारची घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून संपूर्ण गाव पाच दिवस बंद ठेवण्याच्या आवाहनाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
१० शेलपिंपळगाव
काळुस येथील नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली.