५ व ६ जून रोजी मावळ तालुक्यातील सदुंबरे, खालूम्ब्रे, भंडारा डोंगर, नोघोज, म्हळुंगे, नवलाख उंबरे, कासारसाई, चांदखेड, पुसाने, शिवणे आदी गावाच्या शिवारात जाऊन मेंढपाळ परिवातील २०० पेक्षा जास्त जणांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषध दिले.
शिबिराचे आयोजन धनंजय तानले यांनी केले होते, तर डॉ. चंद्रशेखर कोकाटे (जनरल फिजिशियन ॲंड सर्जन), डॉ. सागर शेंडगे (जनरल फिजिशियन अँड सर्जन), डॉ. सौरभ सलगर (जनरल फिजिशियन अँड सर्जन), डॉ. दिनेश गाडेकर (फिजिशियन & अतिदक्षता तज्ज्ञ), डॉ. श्वेता गाडेकर (स्त्रीरोगतज्ज्ञ), डॉ. दादासाहेब पडळकर, (बालरोगतज्ज्ञ), डॉ. सत्यवान गडदे (कान, नाक, घसा तज्ज्ञ), आदी डॉक्टरांनी सहभाग घेतला.
शिबिरासाठी राजेंद्र गाडेकर, सागर खटके, सागर कोळेकर, महावीर सरक, ज्ञानदेव काळे, विकास हजारे, अमोल चोपडे, रामजी कोलेकर, पांडा (देवा) कोळेकर, नाथा कोळेकर, गणेश पाटोळे, धनाजी ढेकळे, प्रमोद गरगडे, दामाजी खांडेकर, लक्ष्मण यमगर, दौलत शिंगटे, पावसू कर्हे, यशवंत दडस, धनाजी शिंगटे यांनी केले.