या संदर्भात अधिक माहिती देताना प्रशांत काळभोर पुढे म्हणाले, की कोरोनाची दुसरी लाट आल्याने संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. संपूर्ण कुटुंबेच्या कुटुंबे बाधित झाली आहेत. त्यातच अनेक नागरिकांची मेडिक्लेम पाॅलिसी नसल्याने दवाखान्याचे बिल भरण्यासाठी लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच आरोग्य विमा ही सध्याची अत्यंत गरजेची गोष्ट झालेली आहे. समाजामध्ये जनजागृती वाढविण्यासाठी व येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी अष्टविनायक प्रतिष्ठानमार्फत कोरोना विमा जागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे.
सोमवार दि. ३ मे ते शुक्रवार दि. ७ मे पर्यंत लोणी काळभोर येथील संत निरंकारी भवन येथे सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत हा सप्ताह साजरा होणार आहे.