शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

थेऊरच्या यशवंत कारखान्याची सुनावणी सोमवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 7:17 PM

यशवंतच्या अवसायकांनी ६ मार्च रोजी यशवंतच्या घेणेदार-देणेदार यांनी साठ दिवसात म्हणणे मांडावे अशी जाहीर नोटीस दिली होती.

ठळक मुद्देकोणत्याही स्थितीत हा कारखाना अवसायनात गुंडाळला जाऊ नये अशी शेतकरी सभासदांची भावना

पुणे : राज्यसरकारने थेऊरचा यशवंत सहकारी साखर कारखाना अवसायनात काढल्याप्रकरणी सभासद शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर येत्या सोमवारी (दि. १६) उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शेतकऱ्यांनी सहा महिन्यांपूर्वी ही याचिका दाखल केली होती. मात्र, त्यावर एकदाही सुनावणी झाली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचिकेवर सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. यशवंतच्या अवसायकांनी ६ मार्च रोजी यशवंतच्या घेणेदार-देणेदार यांनी साठ दिवसात म्हणणे मांडावे अशी जाहीर नोटीस दिली होती. त्यानुसार संस्थेचे कामकाज गुंडाळण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे कळविले गेल्याने यशवंतच्या सभासदांमधे अस्वस्थता पसरली आहे. अवसायकांनी साखर आयुक्तांना यशवंत सुरु करता येणे शक्य असल्याचा अहवाल फेब्रुवारी महिन्यात सादर केला आहे. कारखाना जर सुरु करायचा असेल तर त्यासाठी ४२ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे त्यांनी कळविले होते. दरम्यान, संस्थेचे कामकाज गुंडाळण्याबाबत नोटीस जाहीर केली गेल्याने सभासदांच्या मालकीच्या यशवंत कारखान्याच्या भविष्या बद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे. यशवंत कारखाना चुकीच्या पद्धतीने अवसायनात काढण्यात आला आहे. इतर अनेक कारखान्यांपेक्षा यशवंतची स्थिती चांगली आहे. या बाबी आम्ही उच्च न्यायलयाच्या निदर्शनास आणून देऊ. तब्बल वीस हजार सभासदांच्या मालकीचा हा कारखाना आहे. कोणत्याही स्थितीत हा कारखाना अवसायनात गुंडाळला जाऊ नये, अशी शेतकरी सभासदांची भावना असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अ‍ॅड. योगेश पांडे यांनी सांगितले.   

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखाने