पिंपरी : महापालिकेच्या हद्दीत विविध रुग्णालयांमध्ये डेंगीच्या उपचारासाठी दाखल होणा:या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आतार्पयत डेंगीचे सुमारे 33 रुग्ण आढळून आले असून, 2 जण दगावले आहेत. पालिकेने उपाययोजनांच्या दृष्टीने 9 जून ते 13 सप्टेंबर या कालावधीत 1 लाख 2क् हजार घरांची तपासणी केली आहे. त्यामध्ये 21क्क् डास उत्पत्तीस्थळे आढळून आली. तर पाण्याची डबकी साचवून ठेवणा:या 22 बांधकाम व्यावसायिकांना नोटीस पाठवल्या आहेत. 47 हजारांची दंडवसुलीही केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून डेंगीच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. एप्रिलमध्ये केवळ 2 रुग्ण होते. मेमध्ये ही संख्या 7वर गेली, जूनमध्ये 15, जुलैमध्ये 19, ऑगस्टमध्ये 27 आणि सप्टेंबरच्या मध्यांतरार्पयत ही संख्या 33 वर पोहोचली. पावसाचे पाणी साचून राहिल्यास ती ठिकाणो डेंगीच्या डास उत्पत्तीस पोषक ठरतात. मागील काही दिवसांत पावसाचा जोर होता. पावसामुळे परिसरात अनेक ठिकाणी डबकी तयार झाली आहेत. एडिस इजिप्ताय या डेंगीच्या डासाने चावा घेतल्यास मनुष्याच्या शरीरात डेंगीच्या विषाणूंचा प्रवेश होतो. त्यातून डेंगीचा प्रादुर्भाव जाणवतो. ताप, खोकला, घसा दुखणो ही डेंगीच्या आजाराची लक्षणो आहेत. हा आजार झाल्यास रक्तातील पांढ:या पेशींचे प्रमाण घटते. रोगप्रतिकारकशक्ती कमी होती. रक्तातील पांढ:या पेशींचे प्रमाण वाढविण्यासाठी प्लेटलेट्सची आवश्यकता भासते. डेंगीची
लक्षणो आढळून आलेल्या रुग्णांकडून खासगी रुग्णालयात भरमसाट शुल्क वसूल केले जाते. मलेरियाच्या रुग्णसंख्येत काही दिवसांपासून घट झाली आहे. (प्रतिनिधी)
डेंगीचे 33, मलेरियाचे 9 रूग्ण
सव्वा लाख
घरांचे सव्रेक्षण
नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. डेंगीच्या दक्षतेबाबत ओरड सुरू आहे. त्यामुळे लवकरच वायसीएममधील परिस्थितीचा आढावा घेणार आहे. आरोग्य विभागाला साफसफाईची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांचे काम सुरू आहे. डेंगीच्या डासांच्या प्रसारावर नियंत्रण आणण्याच्या उपाययोजनाबरोबर वैद्यकीय सुविधेकडे लक्ष पुरविणार आहे.
- राजीव जाधव, आयुक्त,
पिंपरी चिंचवड महापालिका
समन्वयाचा अभाव
4डेंगी, तसेच साथीच्या आजाराचे रुग्ण आढळून येताच त्यावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करणो आवश्यक असते. त्यामुळे असे साथीच्या आजाराचे रुग्ण आढळून आल्यानंतर त्याबाबतची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला कळविणो खासगी रुग्णालयांनासुद्धा बंधनकारक आहे. परंतु महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी आणि खासगी रुग्णालये यांच्यात समन्वय नाही. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे डेंगीच्या रुग्णांची नेमकी आकडेवारीही उपलब्ध नाही.