पुणे : मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी दोन ते तीन दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात ब्रम्हपुरी (जि. चंद्रपूर) येथे सर्वाधिक ४६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत काहीशी वाढ झाली. मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी कमाल तापमानात थोडी वाढ झाली. मंगळवारी (दि. २८) विदर्भातील बऱ्याच ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल. तर, २० ते ३१ मे दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे.मध्य महाराष्ट्रात पुण्याला ३८.९, लोहगाव ३९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या २ जूनपर्यंत शहरातील कमाल तापमानाचा पारा ३६ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.मध्य महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन ते ४टक्के वाढ झाली. साताºयामध्ये सर्वाधिक ५.८ अंश सेल्सिअसने कमाल तापमान वाढले. मराठवाड्यातील तापमानाचा पारा साडेचार आणि विदर्भातील तीन अंश सेल्सिअसने वाढला आहे.राज्यातील कमाल तापमान :पुणे ३८.९, लोहगाव ३९.९, जळगाव ४३.२, कोल्हापूर ३८.२, महाबळेश्वर ३३.१, मालेगाव ४२.२, नाशिक३८.१, सांगली ३९.६, सातारा ४०.८, सोलापूर ४३, उस्मानाबाद ४३, औरंगाबाद ४२, परभणी ४६.१, बीड ४४, अकोला ४५.३, अमरावती ४५, बुलडाणा ४१.५, ब्रम्हपुरी ४६.७, चंद्रपूर ४६.४, गोंदिया ४४.८, नागपूर ४६.७, वाशिम ४३.८, वर्धा ४६.५, यवतमाळ ४५.
मध्य महाराष्ट्र, विदर्भात उष्णतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 5:28 AM