आसखेड (पुणे) : येथील परिसरात रात्रीपासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. शिंदे, वासुली, शेलू, आसखेड, थोपटवाडी करंजविहिरे परिसरातील नदीकाठचे शेतकरीही पाण्याअभावी अडचणीत आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी भामा आसखेड धरणातून विसर्ग सोडण्याची मागणी केली होती.
बंधाऱ्यात अतिशय कमी पाणी होते त्यामुळे शेतीस पाणी देणेही अवघड झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांनी भामाआसखेड धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. परंतु, रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे कित्येक पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसाचा जोर दिवसभर कायम असल्याने धरण शंभर टक्के भरेल असा अंदाज आहे. आज अखेर भामाआसखेड धरणात ८९.८४ टक्के पाणीसाठा आहे . तर आत्तापर्यंत ५७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.