पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आज दोन दिवसापासून उकाडा जाणवू लागला होता. दुपारच्या गरमीने नागरिक हैराण झाले होते. आज अखेर उकाड्यापासून पुणेकरांना दिलासा मिळाला. दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटात अन् विजेच्या कडकडाटामध्ये पावसाला सुरुवात झाली.
ऑक्टोबर हिट जवळ येत असल्याने गरमी वाढू लागली आहे. त्यातच परतीचा मान्सूनही सुरु झाला आहे. मागील आठवड्यात हिवाळा सुरु झाल्यासारखे वातावरण तयार झाले होते. त्यातच पावसाने दांडी मारली होती. पण दोन दिवसां पासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. शहारत सर्वत्र उष्ण हवामान जाणवू लागले आहे. आज सकाळ्पासूनच पुण्यात ढगाळ वातावरण झाले होते. पाऊस येण्याची चिन्हेही दिसू लागली होती. अखेर दुपारनंतर वादळी वाऱ्याबरोबरच शहारत जोरदार पावसाला सुरुवात झाली. पुणेकरांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. अनेक भागात अवघ्या २० मिनिटांत पाण्याचे लोंढे वाहताना दिसून आले. काही ठिकाणी तर पार्किंगला लावलेलल्या दुचाकी वाहून चालल्या होत्या. वादळी वाऱ्याने भीतीचे वातावरण
शहरात अचानक सुरु झालेल्या वादळी पावसाने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पावसाबरोबर येणारे वीज आणि ढगांचे आवाज मन हेलावून टाकणारे होते. तसेच सुसाट वाऱ्यामुळे झाडे जोरजोरात एकमेकांवर आदळताना दिसून आली. पावसाच्या भीतीने रस्ते लगेचच सामसूम झाल्याचे दिसून आले. शहरात काही ठिकाणी छोटे मोठे अपघातही घडले.